
राजापूर- सेविकांना पुरविलेले मोबाईल निकृष्ट
फोटो ओळी
-rat8p14.jpg - KOP23L74022 राजापूर ः आमदार राजन साळवी यांना निवेदन देताना अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकारी.
------------
अंगणवाडी सेविकांना पुरविलेले मोबाईल निकृष्ट
तुटपुंजे मानधन ; कोणत्याच आश्वासनाची नाही पूर्तता, आमदार साळवींना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता.८ ः अंगणवाडी सेविकांना शासनाकडून पुरविण्यात आलेले मोबाईल निकृष्ट दर्जाचे आहेत. त्यामुळे काम करताना अडचणी येत आहेत. दिवसागणिक महागाईमध्ये वाढ होत असताना अंगणवाजी सेविका आणि कर्मचार्यांना देण्यात येणार मानधन तुटपुंजे आहे. त्यामध्ये संसार चालवायचा कसा? या मानधनामध्ये दिवाळीपूर्वी वाढ करण्याचे शासनाने यापूर्वी आश्वासन दिलेले होते. मात्र, त्याची अंदापही पूर्तता झालेली नाही. अंगणवाडी कर्मचार्यांचे गेल्या कित्येक वर्षापासून प्रलंबित असलेले प्रश्न सोडविण्यासाठी शासनाचे लक्ष वेधावे अशी मागणी आमदार राजन साळवी यांच्याकडे अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकार्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी संघटनेच्या पदाधिकार्यांशी चर्चा करताना आमदार साळवी यांनी आपल्या प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांचा सरकारकडे पाठपुरावा करून अंगणवाडी कर्मचार्यांना न्याय मिळवून दिला जाईल अशी ग्वाही दिली. अंगणवाडी सेविका आणि कर्मचार्यांच्या गेल्या कित्येक वर्षापासून विविध प्रश्न प्रलंबित आहेत. सातत्याने विविध मार्गांनी शासनाचे त्याकडे लक्ष वेधूनही त्यावर शासनाकडून कोणत्याही योग्य उपाययोजना वा निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा अंगणवाडी कर्मचार्यांची संघटना असलेली अंगणवाडी कर्मचारी सभा (महाराष्ट्र) आक्रमक झाली आहे. या संघटनेच्या तालुक्यातील पदाधिकार्यांनी नुकतीच आमदार साळवी यांची भेट घेवून प्रलंबित समस्यांकडे सार्यांचे लक्ष वेधले. कामांचा बोजा दररोज वाढत चालला आहे. महागाई दिवसागणिक प्रचंढ वाढत चालली आहे. अशा स्थितीमध्ये तुटपुंज्या मानधनामध्ये आम्ही घर, संसार सांभाळायचा कसा? असा सवाल त्यांनी केला.
अंगणवाडी सेविकांना शासनाकडून पुरविण्यात आलेले मोबाईल निकृष्ट दर्जाचे आहेत. त्यामुळे काम करताना अडचणी येत आहेत. दिवसागणिक महागाईमध्ये वाढ होत असताना अंगणवाजी सेविका आणि कर्मचार्यांना देण्यात येणार मानधन तुटपुंजे आहे. त्यामध्ये संसार चालवायचा कसा? या मानधनामध्ये दिवाळीपूर्वी वाढ करण्याचे शासनाने यापूर्वी आश्वासन दिले होते. मात्र त्याची पूर्तता झालेली नाही. अंगणवाडी कर्मचार्यांना वेतनश्रेणी, बोनस, ग्रॅज्युईटी द्यावा. सेविकांना व मिनी सेविकांना 18 हजार रुपये, मदतनीसांना 15 हजार रुपये दरमहा किमान द्यावेत, सेविकांना नवीन मोबाईल शासनाने द्यावेत, पोषण ट्रॅकर पूर्ण मराठीत द्यावे, कुपोषण रोखण्यासाठी आहाराचे आत्ताचे दर तिप्पट करावेत, अंगणवाडी कर्मचार्यांची सध्या बंद करण्यात आलेली भरती प्रक्रीया तातडीने राबवावी आदी विविध मागण्या शासनाकडे करण्यात आल्या.