Mon, Jan 30, 2023

माडखोल-धवडकी
येथून तरुण बेपत्ता
माडखोल-धवडकी येथून तरुण बेपत्ता
Published on : 9 January 2023, 3:22 am
74358
संतोष मुरकर
माडखोल-धवडकी येथून एक बेपत्ता
सावंतवाडी ः माडखोल-धवडकी येथील संतोष दिनकर मुरकर (वय ४०) हे बेपत्ता झाल्याची खबर पत्नी पल्लवी मूरकर यांनी सावंतवाडी पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार बेपत्ताची नोंद करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, मुरकर हे १४ डिसेंबरला सायंकाळी सातच्या सुमारास मुंबईला जातो, असे सांगून घरातून निघून गेले ते अद्याप परतले नाहीत. त्यांचा मोबाईलही बंद लागत असल्याने पत्नीने येथील पोलिस ठाण्यात याबाबतची खबर दिली. मूरकर हे केबल ऑपरेटर म्हणून काम करतात. त्या कामानिमित्त त्यांचे बाहेर जाणे असायचे; मात्र आठ दिवसांत ते घरी परतायचे. यावेळी मात्र अद्यापपर्यंत घरी न परतल्याने पत्नीने याबाबत पोलिस ठाण्यात माहिती दिल्याचे ठाणे अमलदार नाईक यांनी सांगितले.