सातार्डा हायस्कूलचे आज स्नेहसंमेलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सातार्डा हायस्कूलचे 
आज स्नेहसंमेलन
सातार्डा हायस्कूलचे आज स्नेहसंमेलन

सातार्डा हायस्कूलचे आज स्नेहसंमेलन

sakal_logo
By

जानवलीकरांचे
२६ ला उपोषण
कणकवली ः जानवली आदर्शनगर येथील साईसृष्टी अपार्टमेंट व ओम साई सृष्टी अपार्टमेंटच्या सदनिकाधारक, गाळेधारकांनी अपार्टमेंट आवारातील समस्यांबाबत उपोषणाचा इशारा दिला आहे. येत्या २६ जानेवारीला सकाळी दहा वाजल्यापासून जानवली ग्रामपंचायत उपोषण केले जाणार आहे. पोलिस प्रशासनाला तसे निवेदनही दिले. निवेदनात म्हटले आहे की, रहिवाशांनी २०२१ मध्ये एक दिवशी उपोषण केले. त्यावेळी संबंधितांनी आश्वासने दिली होती. मात्र, पूर्तता न झाल्याने १५ ऑगस्ट २०२२ रोजी उपोषण केले. त्यावेळी आमदार नितेश राणे, तसेच जानवली ग्रामपंचायतीने आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेतले; मात्र आश्वासनाची पूर्तता न झाल्याने आता पुन्हा उपोषण करू.
----
कुडाळात १५ ला
‘वॉकथॉन’ रॅली
ओरोस ः रस्ता सुरक्षा अभियान- २०२३ अंतर्गत १५ ला उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, सिंधुदुर्गतर्फे कुडाळ शहरामध्ये ‘वॉकथॉन’ रॅलीचे आयोजन केले आहे. पादचाऱ्यांनी रस्त्यावरून जाताना उजव्या बाजूने चालावे. जेणेकरून समोरून येणारे वाहन आपल्याला दिसेल व अपघात टाळता येईल, हा मुख्य उद्देश आहे. नागरिकांनी रविवारी सकाळी सात वाजता आरएसएन चौक कुडाळ येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहून जनजागृतीस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
--
कोळंब येथे २४ ला
विविध कार्यक्रम
मालवण ः कोळंब येथील महापुरुष पार मंडळातर्फे महापुरुष पार येथे २४ ला विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यानिमित्त सकाळी आठला लघुरुद्र, दुपारी साडेबाराला महाआरती, एकपासून महाप्रसाद, तीनला गाऱ्हाणी, चारला हळदी-कुंकू, धार्मिक विधी, सायंकाळी ६ वाजता आरती व तीर्थप्रसाद, सायंकाळपासून भजने आदी कार्यक्रम होणार आहेत.
--
चेंदवण नवदुर्गा
जत्रोत्सव उद्या
कुडाळ ः चेंदवण-नाईकवाडी येथील श्री देवी नवदुर्गा मंदिर येथील वार्षिक जत्रोत्सव शुक्रवारी (ता. १३) होणार आहे. यानिमित्त सकाळी धार्मिक विधी, सायंकाळी ४ वाजता धार्मिक कार्यक्रम, ७ वाजता आरती, तीर्थप्रसाद आणि रात्री ९.३० वाजता पार्सेकर दशावतार मंडळाचे नाटक होणार आहे.
--
मालवणात उद्या
गारुडेश्वर जत्रोत्सव
मालवण ः धुरीवाडा येथील देव गारुडेश्वराचा जत्रोत्सव शुक्रवारी (ता. १३) साजरा होणार आहे. यानिमित्त नवस बोलणे-फेडणे, तीर्थप्रसाद, रात्री चेंदवणकर-गोरे दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. या कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन धुरीवाडीवासीयांनी केले आहे.