जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून 2 एटीएम व्हॅन

जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून 2 एटीएम व्हॅन

rat१४३३.TXT

बातमी क्र. ३३ ( पान ३ )
ओळी
- rat१४p२६.jpg-
७५५४५
चिपळूण ः रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या दोन एटीएम व्हॅनचे उद्घाटन करताना आमदार शेखर निकम, मंगेश कुलकर्णी, बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे, उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव आदी


जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या २ एटीएम व्हॅन

नाबार्डचे सहकार्य ; सहा तालुक्यातील शेतकऱ्‍यांना आधार

रत्नागिरी, ता. १४ ः जिल्हा बँक आणि नाबार्ड यांच्या संयुक्त निधीतून ग्राहकांच्या सेवेत रूजू होत असलेल्या दोन नवीन एटीएम व्हॅनचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. चिपळूण-गुहागर, संगमेश्वर आणि खेड, मंडणगड-दापोली या दोन विभागातील सहा तालुक्यातील शेतकरी, व्यापारी, ग्राहकांसह अन्य नागरिकांना बँकिंग सेवा पुरवण्यासाठी या व्हॅनचा उपयोग होणार आहे.
व्हॅनचे उद्घाटन बँकेचे संचालक आमदार शेखर निकम, राष्ट्रीय कृषि व ग्रामीण विकास बँकेचे (नाबार्ड) जिल्हा प्रबंधक मंगेश कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. यावेळी बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे, उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव यांच्यासह सर्व संचालक मंडळ सदस्य, बँकेचे कार्यकारी संचालक अजय चव्हाण व अधिकारी उपस्थित होते. बँकेने नोव्हेंबर २०२० पासून प्रथम एका मोबाईल व्हॅनद्वारे बँकेच्या रत्नागिरी-लांजा-राजापूर व संगमेश्वर या तालुक्यात एटीएम सेवा देण्यास सुरूवात केली होती. आता बँकेच्या ताफ्यात आणखी दोन नवीन मोबाईल एटीएम व्हॅन रूजू झाल्या आहेत. संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील बँकेचे ग्राहक, शेतकरी, व्यापारी व नागरिकांना आठवडा बाजार, यात्रा, बस स्टँण्ड आदी ठिकाणी बँकिंग सेवा पुरविण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com