क्राईम

क्राईम

rat१७२२. txt

(टुडे पान ३ साठी)
(टीप- पहिली बातमी दोन कॉलममध्ये घ्यावी.)
(टीप- कालचा पट्टा न लागल्याने परत पाठवत आहे.)

आमदार साळवींसह सहाजण निर्दोष
जनआशीर्वाद यात्रेतील बॅनर फाडल्याचे प्रकरण

रत्नागिरी ः जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन, गैरकायदा जमाव करून मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेच्या स्वागतासाठी शहरातील मजगाव रोड येथे लावण्यात आलेले बॅनर फाडून नुकसान केल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल कऱण्यात आला होता. या प्रकरणी सोमवारी न्यायालयाने संशयितांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. आमदार राजन साळवी (वय ५४, रा. खालची आळी, रत्नागिरी), संजय साळवी (५०, रा. तेली आळी, रत्नागिरी), परेश खातू (४३, रा. संगमेश्वर), प्रसाद सावंत (४०, रा. शिवाजीनगर, रत्नागिरी), प्रकाश रसाळ (६६, रा. नाचणे, रत्नागिरी), प्रशांत साळुंखे (४५, रा. साळवीस्टॉप, रत्नागिरी) आणि इतर आठ ते दहाजण अशी निर्दोष मुक्तता करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

हा प्रकार २४ ऑगस्ट २०२१ दुपारी मारूती मंदिर-मजगाव रोड परिसरात घडला होता. या प्रकरणी पोलिस हेडकॉन्स्टेबल महेश कुबडे यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. तक्रारीवरून पोलिसांनी संशयितांविरुद्ध भादंवि कलम १४३, २६९, ४२७ आणि महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ३७ (१)(३) चा भंग क, १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पाटील करत होते. तपासात पोलिसांनी संशयितांवर कारवाई करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. सोमवारी या खटल्याचा निकाल प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात झाला. न्यायालयाने सर्व संशयितांची सबळ पुराव्या आभावी निर्दोष मुक्तता केली.
----

पालीतील अपघातप्रकरणी चालकावर गुन्हा

रत्नागिरी ः तालुक्यातील पालीजवळ दुचाकीवरील ताबा सुटून झालेल्या अपघातात मृत्यू झालेल्या स्वाराविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रदीप प्रभाकर धाडवे (वय २५, रा. पाली पाथरट, रत्नागिरी ) असे अपघातात मृत्यू झालेल्या स्वाराचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. १४) सायंकाळी साडेसातच्या सुमारास पाली रस्त्यावर उभीधोंड येथे घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री प्रदीप धाडवे दुचाकी घेऊन पाली ते रत्नागिरी असा येत होता. तो उभीधोंड येथे आला असता दुचाकी निष्काळजीपणे चालवल्यामुळे ताबा सुटून त्याचा अपघात झाला. अपघातात त्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी सहाय्यक पोलिस फौजदार मोहन कांबळे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी स्वाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
--
मटका अड्ड्यावर कारवाई

रत्नागिरी ः शहरातील मारूती मंदिर येथील बिअरशॉपीच्या शेजारी बंद असलेल्या टपरीच्या आडोशाला मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी कारवाई केली. साहित्यासह ८८७ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शहर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिद्धेश हेमंत नेरकर (वय २७, रा. रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. हा प्रकार शनिवारी (ता. १४) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास निदर्शनास आला. या प्रकरणी पोलिसनाईक संकेत महाडीक यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अंमलदार करत आहेत.
--

भाजून जखमी झालेल्या वृद्धेचा मृत्यू

चिपळूण ः घरात कोणीही नसताना पेटवून घेणाऱ्या वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता. १५) सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी सावर्डे पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सुषमा दत्ताराम पंडित (६६, तुरंबव हवालदारवाडी) असे मयत झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंडित या मागील तीन वर्षापासून मानसिक अस्वस्थ होत्या. त्यांच्यावर ठाणे येथे उपचार सुरू होते. घरात कोणीही नसताना त्यांनी स्वतःला पेटवून घेतले. यातूनच त्यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी सावर्डे पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
--
लॉकरमधून ६८ हजाराचे दागिने लंपास

चिपळूण ः घराच्या कपाटातील लॉकरमधून ६८ हजाराचे दागिने चोरल्याचा प्रकार शहरातील शिवाजीनगर येथील शिवालय अपार्टमेंट येथे गेल्या आठवड्यात घडला. या प्रकरणी एकावर चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्याण दत्तात्रय काटदरे (२७) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी सांगितले की, याबाबतची फिर्याद चित्रा वैभव वायळ (३७, शिवाजी नगर-शिवालय अपार्टमेंट) यांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील शिवाजीनगर येथील शिवालय अपार्टमेंट येथे १० जानेवारीला सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास काटदरे याने लबाडीच्या इराद्याने वायळ यांच्या घरच्या कपाटातील लॉकरमधून कपाटातील चावीचा वापर करत त्यामधून ६८ हजार किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. या प्रकरणी वायळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com