गंगाधर माईणकर यांचे निधन

गंगाधर माईणकर यांचे निधन

rat18p15.jpg-
76406
गंगाधर माईणकर

गंगाधर माईणकर यांचे निधन
रत्नागिरी, ता. १८ः छत्रपतीनगर येथील निवृत्त शिक्षक गंगाधर भालचंद्र माईणकर (७४) यांचे निधन झाले. खारेपाटण येथील कनिष्ठ महाविद्यालयात इंग्रजी विषयाचे ते शिक्षक होते. इंग्रजी संभाषणाचे ते मार्गदर्शन करत असत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा, सून, जावई व नातवंडे, भाऊ व बहीण असा परिवार आहे.
---------------
rat18p25.jpg-
76452
शिवदास भोसले

शिवदास भोसले यांचे निधन
रत्नागिरी, ता. १८ः येथील हार्मोनियम कारागीर बाजाच्या पेटीला खऱ्या अर्थाने ''संवादिनी'' बनवणारे शिवदास नारायण भोसले (वय ९३) यांचे निधन झाले. अनेक दिग्गज कलावंतांच्या हार्मोनियम शिवदास यांनी तयार करून आणि दुरुस्त करून दिल्यामुळे त्यांची ख्याती सर्वदूर होती. गेल्या ६० वर्षांहून अधिक काळ त्यांनी हार्मोनियम रिपेअरिंग हा व्यवसाय केला. मुंबईला असताना आणि नंतरही त्यांना अनेक मोठ्या कलाकारांचा सहवास मिळाला. त्यामध्ये (कै.) मनोहर चिमोटे, पुरुषोत्तम जलोटा, स्नेहल भाटकर यांचा उल्लेख करावा लागेल. हार्मोनियमवर जेव्हा काही कारणांमुळे आकाशवाणीत बंदी आली होती तेव्हा पंडित चिमोटे गुरूजींनी त्याचा ट्युनिंग तंत्रात बदल केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com