
विविध कलागुणांमुळे चांगला माणूस घडतो
77806
नडगिवे : येथील इंग्लिश स्कूलच्या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन अभिनेते श्रेयस तळपदे यांनी केले. यावेळी अंकिता प्रभुवालावलकर, पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल आदी. (छायाचित्र : रमेश जामसंडेकर)
विविध कलागुणांमुळे चांगला माणूस घडतो
अभिनेते श्रेयश तळपदे : नडगिवे येथील इंग्लिश मीडियम स्कूलचे स्नेहसंमेलन
खारेपाटण, ता.२३ : नियमित अभ्यासासह विविध कलागुणांचीही जोपासना विद्यार्थ्यांनी करायला हवी. त्यामधून चांगला माणूस घडतो, असे प्रतिपादन अभिनेते श्रेयस तळपदे यांनी केले.
नडगिवे येथील आदर्श एज्युकेशन सोसायटीच्या नॅशनल इंग्लिश मीडियम स्कृलचे स्नेहसंमेलन आणि बक्षीस वितरण सोहळा झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन अभिनेते तळपदे यांनी केले. या कार्यक्रमावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अभिनेत्री अंकिता प्रभूवालावलकर, नॅशनल स्कूलचे अध्यक्ष मनोज गुळेकर, कार्याध्यक्ष रघुवीर राणे, परवेज पटेल, प्रविण लोकरे, मोहन कावळे, विजय कलंत्रे, राजेंद्र ब्रम्हदंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात श्रेयश तळपदे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या हस्तकला पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. तसेच विविध स्पर्धा आणि परीक्षांमध्ये गुणवत्ता प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. श्याम सावंत यांनी सूत्रसंचालन केले.
--
इतर मान्यवरांची मनोगते
पोलिस अधीक्षक श्री.अग्रवाल म्हणाले, ‘‘सिंधुदुर्गातील ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिक्षणाचा पाया मजबूत आहे. इथल्या प्रत्येक शाळेत दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रम केले जातात हे पाहून मोठे समाधान वाटते.’’ अंकिता प्रभू वालावकर म्हणाल्या, ‘‘जगभरात मालवणी भाषेचा मोठा चाहता वर्ग आहे. त्यामुळेच मालवणी भाषेतून केलेल्या रिल्सना प्रसिद्धी मिळत आहे. त्यामुळे प्रत्येकाने बोली भाषेचा आदर करायला हवा.’’