
जातीवाचक शिवीगाळ; लोरेतील तिघांना अटक
जातिवाचक शिवीगाळ;
लोरेतील तिघांना अटक
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. २३ ः जमिनीच्या वादातून लोरे येथील सुमन कांबळे यांना जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी पोलिसांनी बाबासाहेब पाटील यांच्यासह तिघांना आज अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता १५ दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. लोरे-मोगरवाडी येथील सर्व्हे क्रमांक १३८ या जमिनीवरून मधुकर कांबळे आणि बाबासाहेब पाटील यांच्यात वाद असून हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. या जमिनीत असलेल्या विहिरीवर असलेला पंप सुरू करण्यासाठी गेलेल्या सुमन कांबळे हिला श्री. पाटील आणि त्यांच्या कुटुंबीयांनी जातिवाचक शिवीगाळ केली, अशी तक्रार सौ. कांबळे यांनी पोलिसांत दिल्यानंतर पोलिसांनी आज बाबासाहेब पाटील, पूजा बाबासाहेब पाटील आणि मुलगा दिग्विजय बाबासाहेब पाटील या तिघांना अटक केली. त्या तिघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना पंधरा दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली.