रत्नागिरी- पतितपावन मंदिरात पुन्हा होणार सहभोजन

रत्नागिरी- पतितपावन मंदिरात पुन्हा होणार सहभोजन

-rat२४p२०.jpg- OP२३L७७९८०
रत्नागिरी ः वीर सावरकर स्मारकामध्ये सहभोजन उपक्रमाची माहिती पत्रकार परिषदेत देताना राजीव कीर. सोबत रूपेंद्र शिवलकर, उन्मेश शिंदे, कुमार शेट्ये आदी.

रत्नागिरीत पुन्हा सुरू सहभोजन, सहभजन

१९३१ला आरंभ ; भंडारी समाज, पतितपावन मंदिराचा पुढाकार

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २४ ः स्वातंत्र्यवीर सावरकर आणि दानशूर श्रीमान भागोजीशेठ कीर यांनी २४ फेबृवारी १९३१ ला पतितपावन मंदिराच्या कलशारोहणाच्या वेळी सुरू केलेला ऐतिहासिक सहभोजनाचा कार्यक्रम पुन्हा सुरू होणार आहे. याकरिता १८ पगड, १२ बलुतेदार समाजांना सोबत घेऊन अखिल भारतीय भंडारी समाज महासंघ आणि रत्नागिरी तालुका भंडारी समाज, पतितपावन मंदिर संस्थेने पुढाकार घेतला आहे. मंदिराचा कलशारोहण वर्धापनदिन आणि भागोजीशेठ यांची पुण्यतिथी याचे औचित्य साधून २४ फेब्रुवारीला ३ हजार लोक यात सहभागी होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
रत्नागिरीत राजकीय बंदी असलेल्या वीर सावरकरांनी समाजक्रांतीचे कार्य केले. सावरकरांचे अनुयायी (कै.) डॉ. महादेव शिंदे यांनी या कार्यात महत्वाची भूमिका बजावण्यासाठी भागोजीशेठ कीर यांची भेट घालून दिली. त्यानंतर अस्पृश्यांना मंदिर प्रवेशासाठी भागोजीशेठ यांनी स्वतः जागा खरेदी करून पतितपावन मंदिराची उभारणी केली. त्याच मंदिराच्या कलशारोहणावेळी सहभोजन व सहभजन हा देशात क्रांती घडवणारा उपक्रम सुरू झाला.
मंदिराच्या आवारातील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकामध्ये पत्रकार परिषेदत राजीव कीर यांनी दानशूर भागोजीशेठ कीर यांच्या कार्याचा आढावा घेतला. ते म्हणाले, ‘भागोजीशेठ यांचे २४ फेब्रुवारी १९४४ ला निधन झाले. त्यांच्या निधनानंतर सहभोजनाचा कार्यक्रम बंद पडला होता; परंतु सर्व समाजाला पुन्हा एकत्रित आणण्याकरिता भंडारी समाज व पतितपावन मंदिर संस्थेने पुढाकार घेतला आहे. त्यामुळे यंदा मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम होईल व प्रतिवर्षी कार्यक्रम करणार आहोत.’
यंदाच्या कार्यक्रमाची धुरा भंडारी समाजाने आपल्या खांद्यावर घेतली आहे. इतर समाजातूनही मदत मिळणार आहे. पुढील वर्षापासून सर्व समाजाच्या सहयोगातून हा कार्यक्रम सुरू ठेवण्याचा निर्धार करण्यात आला आहे.’ पत्रकार परिषदेला पतितपावन मंदिर संस्थेचे अध्यक्ष उन्मेष शिंदे, राजन मलुष्टे, रूपेंद्र शिवलकर, कुमार शेट्ये आदी उपस्थित होते.

चौकट १
असा होईल कार्यक्रम
भागोजीशेठ कीर यांच्या पुण्यतिथीनिमित्त २४ला सकाळी ९ ते ११.३० या वेळेत शहरातून वाहनफेरी काढण्यात येईल. फेरीची सांगता पतितपावन मंदिरात होईल. त्यानंतर सभा होईल. दुपारी १२.३० ते ३ या वेळेत सहभोजन कार्यक्रम होईल. मंदिरासमोरील भागात मंडपाची व्यवस्था करण्यात येणार आहे. वीर सावरकरांवर लिखाण करणाऱ्या व्यक्ती, कलाकारांचा प्रातिनिधिक सन्मान या वेळी करण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com