फोटोसंक्षिप्त-नेत्र चिकित्सा शिबिरास
कासरल येथे प्रतिसाद

फोटोसंक्षिप्त-नेत्र चिकित्सा शिबिरास कासरल येथे प्रतिसाद

फोटोसंक्षिप्त

७८७६२

नेत्र चिकित्सा शिबिरास कासरल येथे प्रतिसाद
तळेरे : ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या वतीने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन कणकवली तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा सातरल कासरल येथे केले होते. या शिबिराचा लाभ ४९ जणांनी घेतला. शिबिराचे आयोजन ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन व लायन्स आय हॉस्पिटल कणकवली तसेच सातरल-कासरल तरुण मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. यावेळी सरपंच मेस्त्री, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष, ह्युमन राईटचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक, जिल्हाध्यक्ष मनोज तोरसकर, तालुकाध्यक्षा संजना सदडेकर, सचिव मनोज वारे, उपाध्यक्ष सदाशिव राणे, निरीक्षक प्रवीण गायकवाड, निवृत्त नायब तहसीलदार तथा संघटनेचे जनसंपर्क अधिकारी साईनाथ गोसावी, शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक, डॉक्टर आदींसह डॉ. अशोक कदम, ऋषिकेश कोरडे, स्पेक्टोमार्टचे मंगेश चव्हाण आदी उपस्थित होते.

७८७६३
ह्युमन राईटच्या कोकण
विभागीय अध्यक्षपदी नाईक
तळेरे : ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या कोकण विभागीय अध्यक्षपदी संतोष नाईक यांची सलग दुसऱ्यांदा फेरनिवड करण्यात आली. याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. नाईक यांनी संघटनेच्या माध्यमातून केलेली सातत्यपूर्ण व उल्लेखनीय कामगिरी लक्षात घेऊन त्यांची पुन्हा दुसऱ्या वेळी निवड करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्ती पत्र राष्ट्रीय अध्यक्ष खंडूदेव कठारे, राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रमोद केसरकर यांचे हस्ते देण्यात आले. तसेच रत्नागिरी जिल्हा संघटक म्हणून विकास पेजे यांची फेरनिवड, तर रत्नागिरी जिल्हा सचिव म्हणून सागर कळबंटे यांची निवड जाहीर करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय पदाधिकारी नवघनं, रामदास खोत, राज्य उपाध्यक्ष दवणे, राज्य सचिव राकेश शिंदे, राज्य निरीक्षक घन:शाम सांडीम, रत्नागिरी जिल्हा संघटक विकास पेजे, सागर कळंबटे, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष मनोज तोरसकर उपस्थित होते. प्रमोद केसरकर यांनी मार्गदर्शन केले. पुणे जिल्हाध्यक्ष शेरे यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमासाठी राकेश शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले. आभार सांडीम यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com