संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त
संक्षिप्त

संक्षिप्त

sakal_logo
By

rat३०३३.txt

( पान २ )

rat३०p४१.jpg ः
७९२५०
गुहागर ःउपक्रमशील शिक्षक पुरस्कार स्वीकारताना सतीश मुणगेकर


सतीश मुणगेकर यांना शिक्षक पुरस्कार

गुहागर ः तालुक्यातील झोबंडी नं. १ प्रशालेचे उपक्रमशील, तंत्रस्नेही उपशिक्षक सतीश मुणगेकर यांना नवी दिशा नवे उपक्रम या राज्यस्तरीय समुहातर्फे अभिनव उपक्रमांसाठी उपक्रमशील शिक्षक पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार राष्ट्रसेवा दलाचे निळू फुले सभागृह, पुणे येथे मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. राज्यातील उपक्रमशील शिक्षकांच्या नवी दिशा नवे उपक्रम या राज्यस्तरीय समुहाच्या माध्यमातून संपादक देवराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आला. महाराष्ट्रातील ५० उपक्रमशील शिक्षकांच्या नवी दिशा नवे उपक्रम या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा व उपक्रमशील शिक्षकांचा गुणगौरव सोहळा हा कार्यक्रम घेण्यात आला. या पुस्तकात मुणगेकर यांच्या "माझे स्वनिर्मित ॲप" या नवोपक्रमाचा समावेश आहे. या कार्यक्रमसाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेचे उपसंचालक रमाकांत काठमोरे, विकास गरूड, शुभांगी चव्हाण, जयेश शेंडकर, विजय आवारे, शिवाजी खांडेकर, सचिन डिंगळे, बाळकृष्ण चोरमले, राजेश सुर्वे, सेवानिवृत्त शिक्षिका विजया महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती. मुणगेकर यांच्यावर राज्यस्तरीय उपक्रमशील शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
--------

rat३०p४०.jpg ः
७९२४९
गुहागर ः हायस्कूलमध्ये समारंभात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मुकुंद गद्रे.

दानशूर कर्ण असावा साऱ्यांचा आदर्श

गुहागर ः दान देताना हातचे राखून न देता सढळ हस्ते द्यावे याकरिता दानशूर कर्ण आपला आदर्श असावा, असे प्रतिपादन मुकुंद गद्रे यांनी केले. गुहागर हायस्कूलमध्ये समारंभात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. ते म्हणाले, कोणतेही काम अथवा क्षेत्र कमी जास्त महत्वाचे नसते तर आपला दृष्टिकोन महत्वाचा असतो. विद्यार्थ्यांनी या आपल्या संस्कारदशेतच आपले आदर्श व्यक्तिमत्व निवडले पाहिजेत. गुहागर हायस्कूलचे १९७५ चे एसएससी बॅचचे विद्यार्थी असलेले गद्रे यांनी गुहागर हायस्कूलमध्ये प्रोजेक्टर, स्क्रीन, लॅपटॉप आदी डिजिटल रूमचे साहित्य भेट दिले. या समारंभाला गुहागर एज्युकेशन सोसायटीचे सचिव संदीप भोसले, शालेय समिती अध्यक्ष दीपक कनगुटकर, संचालक पराग भोसले, ज्योती परचुरे, १९७५ चे एसएससी बॅचचे माजी विद्यार्थी राजेंद्र आरेकर, रमेश बारटक्के, नंदकुमार ढेरे, शरदचंद्र सोमण, उदेग, ओंकार गद्रे, कॉम्प्युटर गुहागरचे मोरे, मुख्याध्यापक शिवाजी आडेकर, सुधाकर कांबळे, विलास कोरके, दिलीप मोहिते, सोनाली हळदणकर, मनीषा सावंत व विद्यार्थी उपस्थित होते.
-----------