शिवम सहकार पॅनेलचे वर्चस्व

शिवम सहकार पॅनेलचे वर्चस्व

swt3031.jpg
79343
देवगडः येथील अर्बन बँक निवडणूकीतील पॅनेलच्या विजयानंतर आनंद व्यक्त करताना विजयी उमेदवार.
(छायाचित्रः वैभव केळकर)
....................................
शिवम सहकार पॅनेलचे वर्चस्व
देवगड अर्बन ः शिवसेना-काँग्रेस पुरस्कृत पॅनलचा धुव्वा
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ३०ः येथील दी देवगड अर्बन को-ऑप. बँकेच्या निवडणूकीत भाजप आणि राष्ट्रवादी पुरस्कृत शिवम् सहकार’ पॅनेलने शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेस पुरस्कृत सहकार समृध्दी’ पॅनेलचा धुव्वा उडवत सर्व १२ जागांवर विजय मिळवला. यापूर्वी शिवम पॅनेलची एक जागा बिनविरोध झाली होती. त्यामुळे बँकेवर एकहाती सत्ता आली आहे.
बँकेच्या एकूण १३ जागांपैकी देवगड तालुका वगळुन उर्वरित तालुक्यामधून सर्वसाधारणमध्ये एक जागा होती. या जागेवर एकच उमेदवारी आल्याने तेथे अनिल (बंड्या) वामन सावंत हे उमेदवार बिनविरोध ठरले होते. त्यामुळे देवगड तालुक्यातील सात संचालक सर्वसाधारणमधून, दोन महिला संचालक तसेच अनुसूचित जाती जमातीमधून एक, इतर मागास प्रवर्गातील एक आणि विमुक्त जाती, भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्ग यातून एक असे एकूण १२ संचालक निवडून द्यायचे होते. १२ जागांसाठी एकूण २२ उमेदवार रिंगणात होते. आज बँकेच्या प्रधान कार्यालयात मतमोजणी झाली. यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी पुरस्कृत शिवम् सहकार’ पॅनेलने (निशाणी कपबशी) शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेस पुरस्कृत सहकार समृध्दी’ पॅनेलचा (निशाणी मासा) धुव्वा उडवला. सर्व जागांवर शिवम् पॅनेलचे सर्व १२ उमेदवार विजयी झाले.
विजयी उमेदवार आणि त्यांना मिळालेली मते अशी, सर्वसाधारण गट -अभय जयंत बापट (1943 विजयी), दिनेश नंदकुमार घाटे (2072 विजयी), अभिषेक अजित गोगटे (1936 विजयी), सदाशिव पुरुषोत्तम ओगले (1945 विजयी), समीर यशवंत पेडणेकर (1931 विजयी), प्रकाश बाळकृष्ण राणे (1808 विजयी), अमोल जनार्दन तेली (1843 विजयी), अब्दुलरशीद अली खान (997), उल्हास कमलाकर मणचेकर (1154), संतोष रवींद्र तारी (1131), किरण हरिश्‍चंद्र टेंबुलकर (1027), रघुवीर शांताराम वांयगणकर (957), अवैध मते 166, महिला राखीव (दोन जागा) -ललिता गजानन शेडगे (1938 विजयी), वैशाली विद्याधर तोडणकर (1977 विजयी), सुगंधा सुरेश साटम (976), विशाखा विकास मांजरेकर (1202), अवैध मते 159, इतर मागास प्रवर्ग -महादेव (बाबा) धोंडू आचरेकर (2175 विजयी), मनोज दत्तात्रय पारकर (1003), अवैध मते 169, अनुसूचित जाती जमाती -सुरेंद्र नारायण चव्हाण (2143 विजयी), सुरेश धाकू देवगडकर (1044), अवैध मते 160, विमुक्त जाती, भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्ग -संजय प्रभाकर बांदेकर (2109 विजयी), धनजंय तुकाराम जोशी (1072), अवैध मते 166

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com