रत्नागिरी- मराठी भाषा संवर्धन पंधरवडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- मराठी भाषा संवर्धन पंधरवडा
रत्नागिरी- मराठी भाषा संवर्धन पंधरवडा

रत्नागिरी- मराठी भाषा संवर्धन पंधरवडा

sakal_logo
By

सोबत फोटो आहे.
- rat३१p२.jpg- KOP२३L७९४२०
रत्नागिरी : गोगटे- जोगळेकर महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रमात बोलताना पहिल्या छायाचित्रात लेखिका रश्मी कशेळकर. सोबत डॉ. चित्रा गोस्वामी, प्रा. शिवराज गोपाळे. दुसऱ्या छायाचित्रात साक्षी चाळके हिची मुलाखत घेताना डॉ. निधी पटवर्धन.

‘गोगटे- जोगळेकर’मध्ये
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३१ : बोली जिवंत राहिली पाहिजे, यासाठी प्रत्येक व्यक्तीने प्रयत्नशील असावे. कोकणातील बोली समृद्ध होण्यासाठी जास्तीत जास्त साहित्य लिहिले गेले पाहिजे. जसे सिंधुदुर्ग जिल्ह्यात बोलीतून लेखक लिहितात तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील तरुणांनी स्वतःच्या बोलीत वास्तव जीवनात आलेले अनुभव साहित्यातून मांडले पाहिजेत. मराठी प्रमाण भाषेबरोबरच स्थानिक बोलींचे संवर्धन करणे गरजेचे आहे. बोली टिकली, तरच मराठी भाषा टिकेल. स्वतःच्या बोलीला कमी न समजता सार्वजनिक ठिकाणी अभिमानाने बोलली पाहिजे, असे प्रतिपादन लेखिका रश्मी कशेळकर यांनी केले.
गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील मराठी विभागातर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. स्त्री, भूमी आणि भाषा या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले.
कथाकथन : सराव आणि सादरीकरण या कार्यक्रमात मुंबई विद्यापीठ युवा महोत्सव सुवर्णपदक विजेती साक्षी चाळके हिने सॅल्यूट आणि श्रीनिवास पानसेचे अंगण या दोन कथांचे सादरीकरण केले. तिला प्रकट मुलाखतीतून डॉ. निधी पटवर्धन यांनी बोलते केले. कथाकथन, अभिनय, वक्तृत्व, सूत्रसंचालन यातील सीमारेषा कशा धुसर असतात, कथांची निवड कशी महत्त्वाची ठरते आणि एक स्पर्धक म्हणून आपण खिलाडू कसे असले पाहिजे, याविषयी साक्षीने विद्यार्थ्यांशी संवाद केला.
विभाग प्रमुख प्रा. शिवराज गोपाळे यांनी प्रास्ताविक केले. कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी यांनी व्यक्त होणे गरजेचे असते. आंतरसंवाद साधला की अभिव्यक्ती उत्तम होते. स्वतःचे छंद शोधा, लिहिते व्हा, असा संदेश अध्यक्षीय समारोपात दिला. या वेळी भाषेचे विभाग प्रमुख, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. प्रा. सीमा वीर यांनी सूत्रसंचालन केले.