राजापूर - विद्यार्थ्यांची देवाचे गोठणे कातळशिल्पला भेट

राजापूर - विद्यार्थ्यांची देवाचे गोठणे कातळशिल्पला भेट

फोटो ओळी-
१) rat३१p१५.jpg - KOP२३L७९५१९ राजापूर ः कातळशिल्पाविषयी विद्यार्थ्यांसह शिक्षकांना माहिती देताना कातळशिल्प संशोधक धनंजय मराठे.


विद्यार्थ्यांची देवाचे गोठणे कातळशिल्पला भेट

अभ्यासक मराठेंकडून घेतली माहिती ः जिज्ञासू अन् संशोधक वृत्तीला चालना
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ३१ ः तालुक्यातील केरावळे केंद्रातील शाळांतील विद्यार्थ्यांनी निसर्गाच्या सान्निध्यात वनभोजनाचा आनंद घेतला. या निमित्ताने अनेक वर्षापूर्वीच्या मानवाच्या अस्तित्वाच्या पाऊलखुणा दर्शविणारे देवाचे गोठणेच्या सड्यावरील कातळशिल्प पाहता आली. या भेटीवेळी अभ्यासक धनंजय मराठे यांनी या कातळशिल्पाविषयी सविस्तर माहिती विद्यार्थ्यांसह शिक्षकांना दिली. त्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या जिज्ञासू अन् संशोधक वृत्तीला काहीशी चालना मिळाली.
तालुक्यातील केरावळे केंद्रातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांचे वनभोजन झाले. या वनभोजनाच्या निमित्ताने या विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेचा आदर्श शाळा पुरस्कार प्राप्त सोलगाव शाळेचे मुख्याध्यापक दिपक धामापूरकर यांच्या संकलल्पनेनुसार देवाचेगोठणे येथील कातळशिल्पाला भेट दिली. या भेटीच्यावेळी कातळशिल्प संशोधक श्री. मराठे यांनी या कातळशिल्पासह त्याच्या संशोधनाविषयी सविस्तर माहिती दिली. नेहमी दक्षिणोत्तर स्थिर राहणारा चुंबक या कातळशिल्पावर अस्थिर होतो. तो कोणतीही अचूक दिशा दर्शवत नाही. याबाबत श्री. मराठे यांनी प्रात्यक्षिकाद्वारे विद्यार्थ्यांना माहिती दिली. या कातळशिल्पाबाबत जगातील अनेक संशोधक संशोधन करत असल्याचे सांगताना कोकणात अशा प्रकारची अनेक कातळशिल्प मोठ्यासंख्येने असल्याचे श्री. मराठे यांनी सांगितले. यावेळी केरावळे केंद्राचे केंद्रप्रमुख दिपेंद्र आपटे, देवाचे गोठणे नं. १ शाळेच्या उज्वला जाधव, सुप्रिया पाटील, देऊळवाडी शाळेतील सीमा शहाणे, केरावळे शाळेतील प्रांजली धामापूरकर, अजयकुमार क्षीरसागर, सोलगांव नं. २ शाळेचे दिपक धामापूरकर, ज्ञानेश्वर मगदूम आदी शिक्षकांसह प्रशाळांमधील स्वयंपाकी, मदतनीस, ग्रामस्थ, पालक मोठ्यासंख्येने उपस्थित होते. कातळशिल्पाच्या या भेटीने विद्यार्थ्यांनी निसर्गाच्या सान्निध्यात काहीकाळ फिरताना कातळशिल्पासह पाठ्यपुस्तकातील विविध गोष्टींची प्रत्यक्ष अनुभूती घेतली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com