साडेदहा लाखांची दारू बांद्याच्या हद्दलगत जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साडेदहा लाखांची दारू
बांद्याच्या हद्दलगत जप्त
साडेदहा लाखांची दारू बांद्याच्या हद्दलगत जप्त

साडेदहा लाखांची दारू बांद्याच्या हद्दलगत जप्त

sakal_logo
By

79573
मोपा ः येथे पोलिसांनी पकडलेल्या मुद्देमाल व संशयितसाह पोलीस अधिकारी व कर्मचारी. (छायाचित्र - नीलेश मोरजकर)

साडेदहा लाखांची दारू
बांद्याच्या हद्दलगत जप्त

मोपा विमानतळ पोलिसांची कारवाई

बांदा, ता. ३१: मोपा विमानतळ (गोवा) पोलिसांनी गोव्यातून सिंधुदुर्गच्या दिशेने ट्रक मधून होणाऱ्या बेकायदा गोवा बनावटीच्या दारूच्या वाहतुकीवर कारवाई करत १० लाख ८२ हजार १६० रुपये किमतीची ३ हजार ३३३.७२ लिटर दारू जप्त केली. बेकायदा दारूची वाहतूक केल्याप्रकरणी चालक विजयभाई बनाभाई चौधरी याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली.
गोव्यातून ट्रक (एमएच १४ डीएम ०६२८) मधून बेकायदा दारूची मोठ्या प्रमाणात वाहतूक होणार असल्याची माहिती मोपा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार मोपा परिसरात रस्त्यावर सापळा रचण्यात आला होता. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक दीपक हळणकर, पोलीस कर्मचारी उमेश विरनोडकर, प्रतिप गावकर, निनाद देऊलकर यांनी केली. पोलिसांनी गोवा बनावटीच्या ॲपल ग्रीन व्होडका, क्लासिक व्हिस्की, टुबर्ग स्ट्रॉंग बियर, बडवयझर म्यॅगनम, किंगफिशर स्ट्रॉंग प्रीमियम बियर, अशी एकूण १० लाख ८२ हजार १६० रुपये किमतीची ३ हजार ३३३.७२ लिटर दारू जप्त केली.