‘एसीबी’ने एकत्र चौकशी करावी

‘एसीबी’ने एकत्र चौकशी करावी

टीपः swt३१३९.jpg मध्ये फोटो आहे.
कुडाळ ः पत्रकार परिषदेत बोलताना संजय पडते अमरसेन सावंत राजन नाईक आदी.


‘एसीबी’ने एकत्र चौकशी करावी

शिवसेना जिल्हाप्रमुख ः नाहक त्रास दिल्यास पुन्हा आंदोलन


कुडाळ, ता. ३१ ः सरपंच तसेच ही कामे करणाऱ्या सुशिक्षित बेरोजगार युवक व मजूर सहकारी संस्था अशा जवळपास दोनशे जणांना एसीबी विभागाने नोटीसा काढल्या आहेत. या नोटीसा देऊन त्यांना नाहक त्रास देण्याचे काम सरकार आणि एसीबी करीत आहेत. परंतु या चौकशीने कोणीही घाबरणार नाहीत; सर्वजण चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहेत. या चौकशीतून काहीही निष्पन्न होणार नाही. परंतु जिल्ह्यात एसीबीचे कार्यालय असूनही रत्नागिरीत चौकशीला बोलावण्यात येत असल्याने या सगळ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातच कुडाळ येथील एसीबी विभागाच्या कार्यालयात एकत्रितपणे चौकशी करावी. अन्यथा पुन्हा एकदा जिल्ह्यातील शिवसैनिक या सरकार विरोधात रस्त्यावर उतरून एसीबी विभागाच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी दिला.
येथील शिवसेना शाखेत जिल्हाप्रमुख पडते यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, तालुकाप्रमुख राजन नाईक, बाळ धुरी, गोट्या चव्हाण आदी उपस्थित होते. श्री. पडते म्हणाले, “राज्यातील सरकार एसीबी विभागाआडून आमदार वैभव नाईक यांची चौकशी करून त्यांना नाहक त्रास देण्याचे काम करीत आहे. या विरोधात शिवसेनेने काही दिवसांपूर्वी आमदार भास्कर जाधव यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ येथील एसीबी विभागाच्या सिंधुदुर्ग कार्यालयावर मोर्चा काढला. त्यानंतर आमदार नाईक यांची रत्नागिरी एसीबी विभागाच्या कार्यालयात चौकशी झाली. त्या चौकशीला आमदार नाईक सर्वतोपरी सामोरेही गेले. सर्व कागदपत्रे व अन्य आवश्यक माहीती सादर केली; मात्र या चौकशीतून काही निष्पन्न होत नसल्याचे सरकारच्या लक्षात आल्याने आता आमदार नाईक यांच्या कार्यकर्त्यांना विनाकारण त्रास देणे, दबाव आणून घाबरवण्याचे काम सुरू आहे. आमदार नाईक यांच्या आमदार फंडातून झालेल्या त्यांच्या मतदारसंघातील कामांबाबत चौकशीच्या नोटीसा रत्नागिरी एसीबी विभागाकडून पाठविण्यात येत आहेत. सरपंच तसेच हि कामे करणार्‍या सुशिक्षित बेरोजगार युवक व मजूर सहकारी संस्था अशा जवळपास दोनशे जणांना एसीबी विभागाने नोटीसा काढल्या आहेत. या नोटीसा देऊन त्यांना नाहक त्रास देण्याचे काम सरकार आणि एसीबी करीत आहेत. परंतु या चौकशीने कोणीही घाबरणार नाहीत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात एसीबीचे कार्यालय असताना हि चौकशी रत्नागिरी जिल्ह्यात का केली जाते? सर्वजण चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहेत. या चौकशीतून काहीही निष्पन्न होणार नाही. परंतु रत्नागिरीत चौकशीला बोलावण्यात येत असल्याने सरपंच, सर्व सामान्य ठेकेदार व मजुर संस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातच कुडाळ येथील एसीबी विभागाच्या कार्यालयात एकत्रितपणे चौकशी करण्यात यावी अशी आमची मागणी आहे. अन्यथा पुन्हा एकदा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसैनिक या सरकार विरोधात रस्त्यावर उतरून एसीबी विभागाच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडतील.” ते म्हणाले, “आमदार फंड हा कोणाचा वैयक्तिक निधी नसून तो शासनाचा निधी आहे. या निधीतून जिल्हा परिषद आणि सार्वजनीक बांधकाम विभागांतर्गत ग्रामपंचायत, मजूर संस्था व सुशिक्षित बेरोजगार संघटनेला कामे वाटून दिली जातात. त्यात आमदार आणि सरपंचांचा वैयक्तिक संबंध नसतो. त्यामुळे आमदार फंडातून झालेल्या विकास कामांची चौकशी लावणे हे चुकीचे आहे. जर चौकशी करायचीच असेल तर जिल्ह्यातील कणकवली व सावंतवाडी या दोन्ही मतदारसंघातीलही आमदार फंडातून झालेल्या कामांची चौकशी करावी.’’ उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत म्हणाले, ‘‘राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व शिवसेना पक्षासोबत आमदार नाईक ठाम राहीले आहेत. त्यामुळेच राज्यातील सरकार अशाप्रकारच्या चौकशी लावून त्यांच्यावर दबाव टाकत आहे. आमदार नाईक हे मंत्री नव्हते, कोणत्याही महामंडळाचे अध्यक्षही नव्हते तर फक्त ते आमदार आहेत. त्यांचा वडिलोपार्जित व्यवसाय आहे. तरीही त्यांना चौकशीतून विनाकारण त्रास दिला जात आहे.’’

चौकट
बाकी आमदारांचीही चौकशी करा
तालुकाप्रमुख राजन नाईक म्हणाले, “फक्त कुडाळचे आमदार वैभव नाईक यांचीच चौकशी कशाला?, कणकवली आणि सावंतवाडी मतदारसंघातील आमदारांची जंगम आणि स्थावर मालमत्तेचीसह त्यांच्याही आमदार फडातील कामांची चौकशी व्हावी.”

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com