
महिमत गडावर श्रमदानातून स्वच्छता मोहीम
rat०११५.txt
(टुडे पान १ साठी)
फोटो ओळी
-rat१p१५.jpg ः
७९७०६
देवरूख ः स्वच्छता करण्यापूर्वीची महिमत गडाची अवस्था पहिल्या छायाचित्रात असून दुसऱ्या छायाचित्रात महिमत गडाचे पालटलेले रुपडे.
-
महिमत गडावर श्रमदानातून स्वच्छता मोहीम
दुर्गवीर प्रतिष्ठान ; धान्य कोठारे झाली स्वच्छ, पुढील मोहिमत वास्तूची स्वच्छता
देवरूख, ता. १ ः गेली तीन वर्षे दुर्गवीर प्रतिष्ठानच्या वतीने अपरिचित व दुर्लक्षित अशा देवरूखजवळील निगुडवाडी येथील किल्ले महिमतगडावर स्वच्छता व श्रमदान मोहीम राबविण्यात आली. किल्ल्याचे संवर्धन व्हावे व किल्ल्याला पर्यटकांनी भेट द्यावी हे ध्येय उराशी बाळगून सातत्याने मोहीम, उत्सव व उपक्रम राबवून प्रयत्न सुरू ठेवले आहेत. याचाच एक भाग म्हणून किल्ले महिमतगडावर श्रमदान मोहीम राबवण्यात आली. अतिशय देखणा असलेला हा किल्ला अनेक वास्तू आपल्या उदरात ठेवून आहे.
पहिल्या दिवसाच्या मोहिमेत एकूण १२ दुर्गवीरांनी सहभाग नोंदवून गडावरील दुर्लक्षित अशा धान्य कोठाराच्या उजवीकडील बाजूमधील दगडमातीचा ढिगारा काढून तो भाग मोकळा केला. पुढील मोहिमेत संपूर्ण वास्तू दगडमातीच्या ढिगाऱ्यातून मोकळी होईल, असे नियोजन करण्यात आले आहे. गडावरती लावलेले सौरदिवे यांची पाहणी करून त्यांचे पॅनल स्वच्छ करण्यात आले. या मोहिमेत सहभागी झालेल्या सभासदांनी गडावर वस्ती केली. बहुतांश सदस्य हे महाविद्यालयीन विद्यार्थी व शासकीय कर्मचारी होते. गडावरील मुख्य दरवाज्यातून आत प्रवेश केल्यानंतर समोरील संपूर्ण भागात पावसाळ्यात झाडीझुडपे वाढली होती. तो संपूर्ण भाग स्वच्छ करण्यात आला.
गडावर येणाऱ्या पर्यटकांचा ओघ वाढला आहे; पण त्याचबरोबर गडावर येणाऱ्या पर्यटकांकडून गडावर पत्रावळी, प्लास्टिकच्या बाटल्या, ग्लास, पार्टी झोडणारे दारूच्या बाटल्या, कोंबड्यांची पिसे टाकून गडावरती अस्वच्छता, घाणीचे साम्राज्य निर्माण करून जात आहेत. यावर वेळीच उपाययोजना केली पाहिजे, असे मत दुर्गवीर प्रतिष्ठानने व्यक्त केले आहे .
या दोन दिवसीय मोहिमेत प्रशांत डिंगणकर, योगेश सावंत, अजय सावंत, राजेश सावंत, अण्णा बेर्डे, शिवम सावंत, सौरभ मांजरेकर, स्वप्नील साप्ते, प्रवीण सोष्ठे, विनय गायकवाड, यश सावंत, सागर सावंत, सोहम सावंत, संकेत सावंत, हर्षल सनगले या दुर्गवीर सदस्यांनी सहभाग नोंदवला. दुर्गवीर प्रतिष्ठान गडावरील कोणत्याही मुळ वास्तूला धक्का न लावता स्वच्छता व श्रमदान करून वास्तू जतन करण्याचे कार्य करत असते. पुढील मोहिमेत सहभागी होण्यासाठी दुर्गवीर प्रतिष्ठानजवळ संपर्क करा, असे आवाहन करण्यात आले आहे.
----