सुजाता राणे ठरल्या पैठणीच्या मानकरी
सुजाता राणे ठरल्या पैठणीच्या मानकरी

सुजाता राणे ठरल्या पैठणीच्या मानकरी सुजाता राणे ठरल्या पैठणीच्या मानकरी

79968
बाव ः महिला सशक्तिकरण कार्यक्रमानिमित्त घेतलेल्या पैठणीच्या खेळात सुजाता राणे विजेत्या ठरल्या. (छायाचित्र ः अजय सावंत)


सुजाता राणे ठरल्या पैठणीच्या मानकरी

बावमधील स्पर्धा; महिला शक्ती प्रतिष्ठानचा उपक्रम

कुडाळ, ता. २ ः सिंधुदुर्ग महिला शक्ती प्रतिष्ठानच्या वतीने बाव येथे आयोजित ‘महिला सशक्तिकरण कार्यक्रम २०२३’ निमित्त झालेल्या पैठणीच्या खेळात सुजाता राणे विजेत्या ठरल्या. त्यांना मानाची पैठणी देऊन गौरविण्यात आले. अंकिता बळी व नियती परब यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकाची पैठणी जिंकली. सर्व विजेत्या महिलांना प्रतिष्ठानच्या अध्यक्षा स्वामिनी परब यांच्या हस्ते मानाच्या पैठणी बहाल केल्या. स्पर्धेत साठ महिला सहभागी झाल्या.
महिला शक्ती प्रतिष्ठानतर्फे ‘महिला सशक्तीकरण’ हा अनोखा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी प्रमुख वक्त्यांनी उपस्थित महिलांना कायदे व त्यांच्या हक्कांविषयी मार्गदर्शन केले. त्यानंतर शुभम क्रिएशन प्रस्तुत साठ महिलांमध्ये पैठणीचा खेळ रंगला. या खेळात अंतिम फेरीत पूजा बावकर, सारा कदम, मानसी जावकर, अंकिता बळी, नियती परब, समिधा करंगुटकर, स्वराली कुबल, प्रिया करलकर, सुजाता राणे, संजना मयेकर व अस्मिता मांजरेकर आदी महिलांची निवड झाली. त्यानंतर रंगलेल्या गुणांकनाच्या सामन्यात सर्वच महिलांमध्ये चढाओढ दिसून आली; मात्र अंतिम टप्प्यात सुजाता राणे यांनी २८५ गुण मिळवून मानाची पैठणी जिंकली. अंकिता बळी यांनी २८३ गुण मिळवत द्वितीय, नियती परब यांनी २५३ गुण मिळवत तृतीय क्रमांकाच्या पैठणीवर वर्चस्व राखले. सर्व विजेत्या महिलांना मानाच्या पैठणी देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे निवेदन शुभम धुरी, ज्योती ठाकूर यांनी केले. महिलांसाठी हळदी-कुंकूचाही कार्यक्रम झाला.
कार्यक्रमाचे उद्‍घाटन नामांकित गायिका सायली सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उद्योजक एस. पी. सामंत, सखी वन स्टॉप सेंटर ओरोसच्या समुपदेशक अॅड. रुपाली प्रभू, राष्ट्रपती पुरस्कार विजेते नीलकंठ परब, बाव सरपंच अनंत आसोलकर, बांबुळी सरपंच प्रशांत परब, सोनवडे सरपंच नाजुका सावंत, महिला शक्ती प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्था (सिंधुदुर्ग) अध्यक्षा स्वामिनी परब, सुधीर परब, महिला पोलिस परब, मयेकर, उद्योजिका पूजा सरवटे, दीपक राऊत, दीपश्री राऊत, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष प्रशांत परब, नागेश करलकर, बाव मुख्याध्यापिका प्राजक्ता वालावलकर, वैष्णवी राऊत, प्रकाश राणे, शरयू सावंत आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com