रत्नागिरी ः संवर्ग 4 मधील शिक्षकांची बदली यादी 6 फेब्रुवारीला

रत्नागिरी ः संवर्ग 4 मधील शिक्षकांची बदली यादी 6 फेब्रुवारीला

संवर्ग चार शिक्षक बदली यादी मंगळवारी
८६५ शिक्षकांची लॉटरी ः पुढील वेळापत्रक बदल
रत्नागिरी, ता. २ ः शिक्षक बदलीच्या कार्यवाहीला मुहूर्त मिळण्यासाठी तब्बल तीन वर्षे लागली. शासनाच्या ऑनलाईन बदली प्रक्रियेमुळे शिक्षकांचा फायदा झाला. घरबसल्या आणि कोणत्याही कार्यालयात न जाता बदली प्रक्रिया झाली आहे. आतापर्यंत ७४६ शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. संवर्ग ४ मधील शिक्षकांच्या बदलीचे वेध लागले असून, ८६५ शिक्षक यादीमध्ये आहेत. ही यादी ६ फेब्रुवारीला प्रसिद्ध होणार आहे तसेच पुढील प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक जाहीर झाले आहे.
सुधारित वेळापत्रक ग्रामविकास विभागाने राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठवलेले आहे. कोविड संसर्गाचे दोन वर्षे आणि तिसरे वर्षे ऑनलाईन बदलीच्या प्रक्रियेत रखडल्यानंतर नोव्हेंबर २०२२ पासून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या बदलीच्या प्रक्रियेला सुरवात झालेली आहे. आतापर्यंत संवर्ग एक ते तीन यातील बदलीपात्र ७४६ गुरुजींच्या बदल्या झालेल्या आहेत. आता संवर्ग चार ज्यात सर्वाधिक शिक्षकांची संख्या असून या शिक्षकांच्या बदलीसाठी अर्ज दाखल करण्यात येत आहेत. या संवर्गात तीन टप्प्यात शिक्षकांच्या बदल्या होणार असून यातील पहिल्या टप्प्यातील बदली पात्र शिक्षकांना ऑनलाईन प्रणालीत अर्ज दाखल करण्यासाठी २१ ते २६ जानेवारीदरम्यान मुदत होती. त्यानंतर ऑनलाईन प्रणालीत २७ ते २ फेब्रुवारी संवर्ग चारच्या पहिल्या टप्प्यातील शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया होणार आहेत. त्यानंतर याच संवर्गातील दुसर्‍या टप्यातील शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया होणार असून यात पात्र शिक्षकांच्या बदलीच्या प्रक्रियेत विस्थापित होणार्‍या शिक्षकांना अर्ज करण्यासाठी २ ते ७ फेब्रुवारीदरम्यान मुदत राहणार आहे. त्यानंतर ८ ते १२ फेब्रुवारीदरम्यान, विस्थापित होणार्‍या शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया होणार आहे. त्यानंतर बदली प्रक्रियेतील शेवटचा टप्पा म्हणजेच अवघड क्षेत्रातील रिक्त असणार्‍या सर्व शाळांमधील शिक्षकांच्या जागा भरण्यात येणार आहेत. यात सुगम क्षेत्रात १० वर्षे काम केलेल्या (अवघड क्षेत्राच्या बाहेर काम करणारे) शिक्षकांची यादी जाहीर करणे आणि अवघड क्षेत्रातील बदलीची प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर बदली झालेल्या सर्व शिक्षकांची यादी २३ फेब्रुवारीला प्रकाशित होणार आहे. संवर्ग ४ मधील ८६५ शिक्षकांच्या बदल्या होणार आहेत.
----
चौकट

शिक्षण विभाग देईल तेथे बदली
बदलीस पात्र असणाऱ्या या शिक्षकांना बदलीसाठी ३० शाळांचे पर्याय भरणे बंधनकारक करण्यात आले होते. यामुळे या टप्प्यात आपली बदली झाली नाही अशा शिक्षकांना विस्थापितांच्या राऊंडमध्ये जावे लागणार आहे. या प्रक्रियेत देखील या शिक्षकांना शाळांचे पर्याय द्यावे लागणार आहेत. विस्थापितांच्या राऊंडमध्ये बदली झाली नाहीतर अंतिम रँडम राऊंडमध्ये बदलीस पात्र शिक्षकांच्या बदल्या केल्या जाणार आहेत. या राऊंडमध्ये त्यांना शाळांचे पर्याय नसून शिक्षण विभाग देईल त्या शाळेवर बदली करून जावे लागणार आहे.
-----
चौकट
विभाग शिक्षक
संवर्ग १ * २४१
* संवर्ग २ * १०६
* संवर्ग ३ * ३९९
* संवर्ग ४ * ८६५

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com