पावस ः पावसच्या नवलादेवी मंदिरावर कलशारोहण

पावस ः पावसच्या नवलादेवी मंदिरावर कलशारोहण

फोटो ओळी
-
rat३p२४.jpg ः KOP२३L८०१९९पावस ः ग्रामदेवता नवलादेवी मंदिरावर कलश बसवताना परमपूज्य उल्हासगिरी महाराज आणि देवस्थान समितीचे सदस्य. (छायाचित्र ः मयूर विश्वासराव, पावस.)
------------
वाद्यांच्या गजरात नवलादेवी मंदिरावर कलशारोहण
पावसची ग्रामदेवता ; हजारो भाविकांची उपस्थिती
पावस, ता. ३ ः रत्नागिरी तालुक्यातील पावस येथील ग्रामदेवता श्री नवलादेवी मंदिरावर वाद्यांच्या गजरात आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत कलशारोहण जल्लोषात करण्यात आले. परमपूज्य उल्हासगिरी महाराज यांच्या हस्ते मंदिरावर कलश रोवण्यात आला.
या सोहळा पाहण्यासाठी पावस परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामदेवता नवलादेवी मंदिराच्या जीर्णोद्धाराला १० वर्षांपूर्वी सुरवात करण्यात आली होती. ग्रामस्थ, हितचिंतक, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून जीर्णोद्धार पूर्णत्वास गेला. त्यानंतर कलशारोहण सोहळ्यानिमित्त गेले तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रम सुरू होते. शुक्रवारी (ता. ३) सकाळी मंत्रघोषात होमहवन करण्यात आले. त्यानंतर कलशपूजा करण्यात आली. हजारो लोकांच्या उपस्थितीमध्ये राजापूर तालुक्यातील ओणीतील गगनगिरी महाराज मठाचे मठाधिपती परमपूज्य उल्हासगिरी महाराज यांच्या हस्ते व ग्रामस्थांच्या देवस्थान समिती विश्वस्त यांच्या उपस्थितीत कलश बसवण्यात आला. यानंतर मंदिराच्या परिसरात ढोलवादन करण्यात आले. सर्व भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com