साखरपा ः सर्वसाधारण आरक्षण पडल्यास दाभोळे जि. प. गटात श्रीधर कबनुरकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साखरपा ः सर्वसाधारण आरक्षण पडल्यास दाभोळे जि. प. गटात श्रीधर कबनुरकर
साखरपा ः सर्वसाधारण आरक्षण पडल्यास दाभोळे जि. प. गटात श्रीधर कबनुरकर

साखरपा ः सर्वसाधारण आरक्षण पडल्यास दाभोळे जि. प. गटात श्रीधर कबनुरकर

sakal_logo
By

श्रीधर कबनुरकर
-rat3p27.jpg ः L80231 श्रीधर कबनुरकर
-------------
दाभोळे जिल्हा परिषद गटात
श्रीधर कबनुरकरांचे नाव पुढे
सर्वसाधारण आरक्षणावर मदार ;भाजपतर्फे झालेल्या बैठकीत शिक्कामोर्तब
साखरपा, ता. ३ ः आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या आरक्षणात दाभोळे जिल्हा परिषद गटात खुले आरक्षण मिळाल्यास भाजपतर्फे श्रीधर कबनुरकर हे निवडणुकीच्या रिंगणात असतील. नुकत्याच झालेल्या एका बैठकीत कबनुरकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
दाभोळे जिल्हा परिषद गटातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामपंचायत सदस्य तसेच काही प्रतिष्ठित नागरिक यांची एकत्र बैठक साखरपा येथील कबनुरकर सभागृहात पार पडली. या बैठकीत आगामी काळात पक्षवाढीसाठी चर्चा व विविध उपाययोजनांबाबत विस्तृत चर्चा करण्यात आली. भाजपा संगमेश्वर, संघटन सरचिटणीस अमित केतकर यांनी आगामी जि. प., पंचायत समिती निवडणुकीसाठी सर्वसाधारण आरक्षण पडले तर भाजपचे अधिकृत उमेदवार सामाजिक कार्यकर्ते श्रीधर कबनुरकर असावेत, असा प्रस्ताव उपस्थित मंडळींसमोर मांडला. सर्वांनीच या प्रस्तावाचे स्वागत करत एकमताने अनुमोदन दिले. कबनुरकर यांनीही कार्यकर्त्यांचा मान राखत ही आव्हानात्मक जबाबदारी स्वीकारण्यास निर्णायक सहमती दिली.
केतकर म्हणाले,‘ कबनुरकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सामजिक क्षेत्र आणि भाजपा यात काम करत असताना त्यांनी आपले कार्यकर्तेपण चिरंतर जपले आहे. रवींद्र चव्हाण यांच्याकडे मागणी लावून धरू. श्रेष्ठी श्रीधर कबनूरकर यांचा विचार करतील. अद्याप युतीबाबत कोणतीही चर्चा नाही. तथापि युती झाल्यास आपली ताकद वाढेल. शिंदे गटाचे शिवसैनिक या अजातशत्रू व्यक्तिमत्त्वाचे नेतृत्व स्वीकारतील. या सर्व काळात आपली जबाबदारी कैकपटीने वाढणार आहे. त्यामुळे उपस्थित कार्यकर्त्यांना ''आता तयारीला लागा'' असा संदेश अमित केतकर यांनी दिला आहे.