पाटील दाम्पत्याचा राज्य पुरस्काराने गौरव

पाटील दाम्पत्याचा राज्य पुरस्काराने गौरव

80460
पुणे ः येथे जे. डी. पाटील व स्वाती पाटील यांचा सत्कार करताना मान्यवर.


पाटील दाम्पत्याचा राज्य पुरस्काराने गौरव

पुण्यात सन्मान; ‘नवी दिशा नवे उपक्रम’ पुस्तक प्रकाशन सोहळा

बांदा, ता. ४ ः ‘नवी दिशा, नवे उपक्रम’ या राज्यस्तरीय समुहाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील ५० उपक्रमशील शिक्षकांच्या ‘नवी दिशा नवे उपक्रम’, या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा व उपक्रमशील शिक्षकांचा गुणगौरव सोहळा नुकताच पुणे येथे दिमाखात झाला. या सोहळ्यात बांदा नं. १ केंद्रशाळेचे उपक्रमशील शिक्षक जे. डी. पाटील व कास शाळेच्या उपशिक्षिका स्वाती पाटील यांना राज्यस्तरीय उपक्रमशील पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
देवराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली साकारलेल्या या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी शिक्षण उपसंचालक विकास गरड, उपप्रशासकीय अधिकारी शुभांगी चव्हाण, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी जयेश शेंडकर, विजय आवारे, शिवाजी खांडेकर, सचिन डिंबळे, बाळकृष्ण चोरमले, सेवानिवृत्त शिक्षिका विजया महाडिक यांच्या उपस्थितीत या पुस्तकाचे प्रकाशन राष्ट्र सेवादलाचे निळू फुले सभागृह, सानेगुरुजी स्मारक पुणे येथे झाले. या पुस्तकात सिंधुदुर्ग जिल्ह्यातून बांदा नं. १ केंद्रशाळेचे उपक्रमशील शिक्षक पाटील यांचा नियमितपणे शाळेत घेण्यात येणाऱ्या पाचवी शिष्यवृत्ती सराव पेपरमध्ये २०० गुण मिळवा व २ रुपये मिळवा या उपक्रमाचा समावेश आहे. हा उपक्रम शाळेत मागीलवर्षी त्यांनी राबविला होता. या उपक्रमामुळे शाळेतील अनेक विद्यार्थी राष्ट्रीय ग्रामीण व जिल्हा शिष्यवृत्तीधारक बनले. सावंतवाडी तालुक्यातही २६६ गुण मिळवत विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक पटकावला होता. तर कास शाळेच्या उपशिक्षिका पाटील यांचा ‘पक्का पाया शिष्यवृत्तीचा’ याही उपक्रमाचा समावेश या पुस्तकात आहे. त्यांनी पहिलीपासून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची आवड निर्माण व्हावी, यासाठी शाळास्तरावर विविध उपक्रमांचे आयोजन करून उपक्रम यशस्वी पार पाडला आहे. त्यामुळे या शाळेचे अनेक विद्यार्थी शिष्यवृत्ती व विविध स्पर्धात्मक उपक्रमांत यशस्वी ठरले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com