गुहागर-विद्यार्थ्यांनी गिरवले मार्केटिंगचे धडे

गुहागर-विद्यार्थ्यांनी गिरवले मार्केटिंगचे धडे

फोटो ओळी
-rat५p१२.jpg-KOP२३L८०६०३
गुहागर ः मार्केटिंग कौशल्यावर आधारित स्पर्धेत विजयी झालेल्या विद्यार्थ्यांसह मान्यवर.
-------------

विद्यार्थ्यांनी गिरवले मार्केटिंगचे धडे

पाटपन्हाळे महाविद्यालयात ; गावागावांत जावून केले मार्केटिंग

गुहागर, ता. ५ : तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पाटपन्हाळे महाविद्यालयात वाणिज्य विभागाच्या वतीने कॉमर्स फेस्टचे २०२३ चे आयोजन केले होते. यामध्ये वाणिज्य प्रश्नमंजूषा, पीपीटी सादरीकरण, पुस्तक परिक्षण, फोटोग्राफी स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये सर्वात शेवटी आणि आकर्षणाची स्पर्धा म्हणजे मार्केटिंग स्पर्धा होती. यामध्ये विद्यार्थ्यांनी मार्केटिंगचे धडे गिरवले.
विद्यार्थ्यांच्या व्यावसायिक गुणांना वाव मिळावा, त्यांना मार्केटिंग कौशल्ये समजावीत, त्यांच्या ज्ञानात व आत्मविश्वासात वाढ व्हावी तसेच केवळ पुस्तकी ज्ञान न घेता व्यावहारिक अनुभव यावा आणि प्रत्यक्ष ग्राहकांना वस्तू विक्री करण्याचा अनुभव यावा यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेमध्ये २२ गट होते व प्रत्येक गटामध्ये ४ विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला होता. प्रत्येक गटासाठी मार्केटिंग करण्यासाठी वेगळी वस्तू देण्यात आली होती.
तालुक्यातील खातू मसाले प्रॉडक्ट, अमोरे येथील शंतनू प्रॉडक्ट, रामबंधू मसाले, इडली, विविध कंपन्याच्या साडी, विरी पत्रावली, पापड, कुरडई, चकली, कोकम पदार्थ, पर्स आणि घरगुती अशा विविध वस्तूंचा समावेश होता. प्रत्येक गटातील विद्यार्थ्यांनी शृगांरतळी, गुहागर, आबलोली, तळवली बाजारपेठ, पालपेणे, वडद, निगुडळ, वेळंब, चिखली, जानवळे, असगोली आणि परचुरी गावात जावून मार्केटिंग केले. सर्व गटांनी मिळून एक लाखापेक्षा अधिक विक्री केली. प्रत्यक्ष अनुभव घेतल्यानंतर त्याचे सादरीकरण महाविद्यालयात केले. त्याचे परीक्षण चिपळुण लायन्स क्लब गॅलेक्सीच्या अध्यक्षा तेजल पेढांबकर आणि लायन्स क्लबचे अध्यक्ष व प्रसिद्ध उद्योजक शामकांत खातू यांनी केले.
-----
चौकट
मार्केटिंगमधील विजेते
यामध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस व ट्रॉफी टीवायबी कॉमच्या प्रणव टाणकर, हिमांशु साळवी, कल्पेश खांडेकर, सोनिया पावस्कर या गटाने खातु मसाले प्रॉडक्टच्या वस्तूंचे मार्केटिंग करून मिळविले. द्वितीय क्रमांक ईश्वरी संसारे, स्वेता शितप, दीप्ती कावणकर, सेजल झोरे या एसवाय बीकॉमच्या गटाने असोरे येथील शंतनू प्रॉडक्टच्या वस्तूंचे मार्केटिंग करून मिळविले. तृतीय क्रमांकाचे बक्षीस दीक्षा बागकर, ऋतुजा साळवी, वसुधा भागडे, वैष्णवी धामणस्कर या एफवाय बीकॉमच्या गटाने विरी पत्रावळी या वस्तूंचे मार्केटिंग करून मिळविले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com