संत रोहिदास भवनासाठी १० लाख देणार

संत रोहिदास भवनासाठी १० लाख देणार

80643
कणकवली ः संत रोहिदास जयंती सोहळ्याचे उद्‍घाटन करताना आमदार वैभव नाईक. बाजूला समीर नलावडे, विजय चव्हाण, पंढरी चव्हाण, सुजित जाधव, छोटू कदम.

80644
कणकवली ः संत रोहिदास जयंतीनिमित्त भव्य रॅली काढण्यात आली. (छायाचित्रे ः अजय सावंत)


संत रोहिदास भवनासाठी १० लाख देणार

आमदार वैभव नाईक ः कणकवलीत जयंतीनिमित्त अभिवादनासह भव्य रॅली

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ५ ः संत रोहिदास भवनाचे तुमचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल. यापूर्वी १५ लाख निधी दिला आहे. आता उर्वरित कामासाठी १० लाखाचा निधी दिला जाईल, असे आमदार वैभव नाईक यांनी आज संत रोहिदास जयंती सोहळ्याप्रसंगी कणकवली येथे जाहीर केले. चर्मकार समाजाच्या सर्व संघटनेच्या वतीने आज एकत्रित संत रोहिदास जयंती साजरी करण्यात आली. भव्य रॅली ढोल पथकाने या सोहळ्यात रंगत आली.
सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाजाच्या जिल्ह्यातील भारतीय चर्मकार समाज मुंबई महाराष्ट्र, सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार उन्नती मंडळ आणि संत रोहिदास सेवाभावी संघटना यांच्यावतीने कृती समितीचे प्रमुख विजय चव्हाण व समितीचे पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली ब्रिजच्या खाली संत रोहिदास यांच्या ६४५ व्या जयंतीचे आयोजन केले होते. कुडाळ-पणदूर येथून समाज कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी भारतीय चर्मकार समाज मुंबई महाराष्ट्र अध्यक्ष पंढरी चव्हाण, उद्योजक बाबल पावसकर यांच्या नेतृत्वाखाली पणदूर ते कणकवली मोटारसायकल व कार रॅली काढून वातावरण निर्मिती केली. कणकवली येथील डॉ. बाबासाहेब आबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून सिंधूगर्जनाच्या लक्षवेधी ढोलपथकाने या रॅलीची सुरुवात कणकवली बाजारपेठ येथून कार्यक्रमस्थळी करण्यात आली. जयंती सोहळ्याच्या ठिकाणी या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार नाईक, कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते झाले. यावेळी शिवसेना युवा नेते संदेश पारकर, नगरसेवक सुशांत नाईक, भारतीय चर्मकार समाज मुंबई महाराष्ट्र अध्यक्ष पंढरी चव्हाण, सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार उन्नती मंडळ अध्यक्ष सुजित जाधव, संत रोहिदास सेवाभावी संघटना अध्यक्ष छोटू कदम, कृती समिती प्रमुख व प्रशासकीय अधिकारी विजय चव्हाण, इतिहास संशोधक सोमनाथ कदम, संजय कदम, बाबल पावसकर, के. टी. चव्हाण, चंद्रसेन पाताडे, अरुण होडावडेकर, अॅड. अनिल निरवडेकर, आनंद जाधव, प्राजक्त चव्हाण, सी. डी. चव्हाण, अॅड. विराज भोसले, भारत पेंडुरकर, प्रतिक्षा चव्हाण, रघुनाथ चव्हाण, आंनद जाधव, रश्मी कुडाळकर, मानसी चव्हाण, मयूरी चव्हाण, सुप्रिया जाधव, मंगेश चव्हाण, अंकुश चव्हाण, जिल्ह्यातील समाजबांधव आदी उपस्थित होते.
आमदार नाईक म्हणाले, ‘‘आज सगळीकडे संत रोहिदास यांची जयंती साजरी केली जात आहे. समाज संघटन महत्त्वाचे आहे. आज तुमचा समाज या सोहळ्याच्या निमित्ताने एकत्र आला. अशीच एकजूट कायम ठेवली पाहिजे. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध राहु. संत रोहिदास यांचा आदर्श प्रत्येकाने जोपासून वाटचाल केली पाहिजे.’’
सुजित जाधव म्हणाले, ‘‘आपल्या समाजाच्या तिन्ही संघटना एकत्र आल्या ही आपली ताकद आहे. यामध्ये सर्वांचे योगदान आहे. भविष्यात आपले संत रोहिदास यांचा भव्य पुतळा कणकवली येथे होण्यासाठी नगरपंचायतने पुढाकार घ्यावा.’’ पंढरी चव्हाण, विजय चव्हाण, अॅड. निरवडेकर, अॅड. विराज भोसले, नंदन वेंगुर्लेकर यांनी आज आपला समाज संत रोहिदास यांच्या जयंतीच्या निमित्ताने एकत्र आला, ही एकजुटीची साथ अखंड ठेवूया. आपल्या एकजुटीची दखल सर्वांना घ्यावी लागेल, अशी भविष्यात कामगिरी करावी लागेल, असे सांगितले. प्रसाद मसुरकर यांनी सूत्रसंचालन केले. चंद्रसेन पाताडे यांनी आभार मानले.
--
राणेंच्या मदतीने नक्कीच सहकार्य ः नलावडे
नगराध्यक्ष नलावडे म्हणाले, ‘‘जिल्ह्यात १२८ ठिकाणी आज संत रोहिदास यांची जयंती साजरी होत आहे. हा सोहळा आज याठिकाणी झाला. पुढचा जयंती सोहळा हा संत रोहिदास भवनात होईल, याची मी तुम्हाला ग्वाही देतो. तुमच्या समाजाचा नगरसेवक, बांधकाम सभापती आहे. आमची नगरपंचायत समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून निश्चितच सहकार्य केले जाईल.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com