लाखो भाविकांचे श्रद्धास्थान श्री गवळदेव

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान श्री गवळदेव

80757
श्री गवळदेव

80760
कुडाळ ः येथील श्री गवळदेव महाराज यांची विष्णू अवतारातील पूजा. (छायाचित्र ः अजय सावंत)

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान श्री गवळदेव

लीड
कुडाळ शहरातील श्री गवळदेव हा लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. कुडाळाच्या धार्मिक वैभवात हे देवस्थान भर टाकत आले आहे. गेली २५ वर्षे या मंदिरात सातत्याने नाविन्यपूर्ण विविध कार्यक्रम श्री गवळदेव मित्रमंडळ व श्री गवळदेव उत्सव मंडळाच्या माध्यमातून दिमाखात होत आहेत. यंदाचे २५ वे रौप्य महोत्सवी वर्ष असल्यामुळे हा सोहळा १ फेब्रुवारीपासून दिमाखात भक्तिमय वातावरणात साजरा होत आहे. भाविकांची अलोट गर्दी या सोहळ्याला होत आहे.
- श्री. नंदू गावडे, कुडाळ
----------
गेल्या २५ वर्षांच्या कारकीर्दीत या ठिकाणी आमुलाग्र बदल घडत आहेत. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान श्री गवळदेव आहे. कुडाळ शहराचा जसजसा विकास होत गेला, त्या विकासात धार्मिक क्षेत्र म्हणून श्री गवळदेवला नावलौकिक प्राप्त झाला. येथील श्री देव कुडाळेश्वर, श्री देवी केळबाई, श्री देव भैरव, श्री समादेवी, श्री महालक्ष्मी मारुती मंदिर या देवतांसह श्री गवळदेवमुळे कुडाळच्या वैभवात भर पडली आहे. श्री गवळदेव मंदिर वटवृक्षाच्या छायेखाली असून त्या बाजूचा परिसर मोकळा असल्यामुळे शहरातील गवळी लोक आपल्या गायी, म्हैशी चरवण्यासाठी आणत असत व विश्रांतीसाठी वटवृक्षाच्या छायेखाली बसून सायंकाळी आपली गुरे घेऊन जात असत. ही परंपरा १९६२-६५ पर्यंत सुरू होती. त्यानंतर कुडाळ शहराचा कायापालट होत असल्यामुळे गवळी लोकांची गुरे कमी झाली. तरी दिवाळीच्या वेळी गायी, म्हैशींच्या शिंगांना रंग काढून गवळदेवपर्यंत आणून घरी नेत असत. कुडाळच्या आठवडा बाजारादिवशी पाट, परुळे, म्हापण, वेतोरे या ठिकाणचे दुकानदार बैलगाडी घेऊन बाजाराला येत असत. सायंकाळी बाजार घेऊन श्री गवळदेवचा चढाव चढल्यानंतर विश्रांतीसाठी थांबत व श्री गवळदेवचे दर्शन घेऊन आपल्या गावी जात असत. या ठिकाणी कवी चि. त्र. खानोलकर यांनी कविता केल्या आहेत. वालावलकर दशावतार नाट्यमंडळाचे मालक (कै.) बाबी नालंद यांनी दशावतार कलेची सुरुवात याच ठिकाणापासून केली. त्यांना भारत सरकारच्या कला अॅकॅडमीचा पुरस्कार मिळाला होता. याचा उल्लेख त्यांनी आपल्या मुलाखतीमध्ये केला आहे. या ठिकाणी मे महिन्यामध्ये सत्यनारायण पूजेचे आयोजन (कै.) शिरी सावंत, (कै.) पांडुरंग सावंत, मधू पडते आदी करत असत. ती परंपरा (कै.) आनंद सावंत, सदानंद सावंत यांनी सुरू ठेवली. तसेच मकर संक्रातीदिवशी सांगिर्डेवाडीतील (कै.) आबा राणे व त्यांचे बंधू जत्रोत्सव करत असत. ती परंपरा (कै.) तुकाराम पडते, (कै.) गुंडू पडते, (कै.) बापू पडते, श्री. प्रभाकर पडते यांनी सुरू ठेवली होती.
या परिसराची लोकांच्या देणगीमधून पार, समोरील मंडप आदी कामे करण्यात आली होती. दर सोमवारी श्रींची आरती करण्याचे ग्रामस्थांकडून ठरविण्यात आले. त्याप्रमाणे ती आजपर्यंत सुरू आहे. मंडळाने पुढील सत्यनारायण पूजा, जत्रोत्सव मंडळामार्फत करण्यास सुरुवात केली आहे. श्रींची मूर्ती जुनी असल्यामुळे ती नवीन करण्याचे ठरविण्यात आले. त्यासाठी श्री कुडाळेश्वर ग्रामदेवतेला कौल लावण्याचे प्रयत्न सुरू केले; मात्र कौल मिळत नसल्यामुळे काही वर्षे काम होऊ शकले नाही. त्यानंतर पुन्हा विचार करून श्रींचा कौल घेण्याचे ठरले असता त्या ठिकाणी गवळदेव आणि अन्य दोन पाषाणाशिवाय अजून पाषाण असल्याचे सांगण्याचा कौल दिला. या पाषाणाच्या दर्शनाचा मीही साक्षीदार आहे. एकदा बाळा सामंत यांच्या दुकानात मी नंदू गावडे, अनिल पडते, विलास पावसकर बसले असता अचानक मंदिरात जाण्याची बुद्धी झाली आणि आम्ही सर्वजण मंदिरात गेलो. यावेळी १५ ते २० फुटांवर असताना दोन पाळांमधून एक ते दोन इंच बाहेर असलेले दगडाचे पाषाण नजरेस पडले. त्यानंतर त्या पाषाणावर अभिषेक करून तातडीने श्री कुडाळेश्वर देवाकडे कौल लावला असता जीर्णोद्धार करण्याचा कौल मिळाला होता. (पुरवणी संकलन - अजय सावंत)
----
..अन् जीर्णोद्धार समिती स्थापन
मंडळाने परिसरातील सर्व ग्रामस्थांची सभा आयोजित केली होती. यावेळी कुडाळ शहारातील ज्येष्ठ ग्रामस्थ (कै.) तात्यासाहेब घुर्ये, (कै.) धोंडदेव पडते, (कै.) मदन मालवणकर, मोहन पडते आदींच्या मार्गदर्शनाने जीर्णोद्धार समिती स्थापन करण्यात आली. त्यावेळी त्या समितीच्या अध्यक्षपदी (कै.) प्रफुल पडते यांची निवड करण्यात आली. कार्यक्रमाची रुपरेषा ठरवून तातडीने निधी संकलनाचे काम (कै.) तात्यासाहेब घुर्ये यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. सर्व कार्यकर्त्यांच्या मदतीमुळे महिन्यामध्ये निधी संकलन व इतर कामे करून ७ फेब्रुवारी १९९७ ला मूर्तीची प्रतिष्ठापना करून भव्यदिव्य स्वरुपात हा कार्यक्रम यशस्वी करण्यात आला. मंदिराचे काम राजन बांदेकर व आपा पडते यांनी करून सहकार्य केले. यावर्षी रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करण्याचे ठरविण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com