सदर ःनिश्चितपणे विकूही शकतो | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सदर ःनिश्चितपणे विकूही शकतो
सदर ःनिश्चितपणे विकूही शकतो

सदर ःनिश्चितपणे विकूही शकतो

sakal_logo
By

rat०७१२.txt

१ फेब्रुवारी टुडे पान तीन
( टुडे पान ३ साठी)

धरू कास उद्योजकतेची.......... लोगो

फोटो ओळी
-rat७p६.jpg ः
८१०२६
प्रसाद जोग
--
कृषी उत्पादनातून चांगल्या पद्धतीने नफा मिळू शकतो या विश्वासावर व ऐकीव माहितीवर किंवा कधी अपुऱ्या तयारीने बिगर हंगामी किंवा हंगामी वेगवेगळ्या पिकांची लागवड करण्याचे धाडस उद्योजकीय मानसिकतेतून नव कृषी उद्योजक करत असतात. यामध्ये त्यांना आपण कृषी माल उत्पादित करू शकतो, याची पूर्ण खात्री असते; पण त्यांना सातत्याने एक प्रश्न पडत असतो तो म्हणजे आपल्या शेतातून तयार होणाऱ्या कृषिमालाला योग्य बाजारपेठ मिळेल काय? या प्रश्नाचा घेतलेला वेध.
--

- प्रसाद जोग, चिपळूण
--
कलिंगड पिकवू शकतो तर निश्चितपणे विकूही शकतो


कोकणात भातशेती आटोपल्यानंतर हल्ली शेतकरी काकडी, भेंडी, दोडकी, कारली, मेथी, पालक अशा भाज्या घेणे पसंत करतात तर काही शेतकरी आपली जमीन भाडेतत्त्वावर दुसऱ्या शेतकऱ्यांना कलिंगड लागवडीसाठी देत असतात. कोरोनाच्या काळात काही तरुण गावाकडे आले व आपल्या शेतीत स्थिरावले. त्यामुळे गावागावात भाजीपाला, कलिंगड लागवड करण्याचे प्रमाण हळूहळू वाढत चालले आहे व त्यातून आता प्रश्न उपस्थित होत आहे. आम्हाला पिकवायला तर जमतंय; पण आमचा माल विकायला आम्हाला खूप कसरत करावी लागत आहे कारण, स्वतःच शेती करून त्यात उद्योगनिती वापरून आपलं स्वतःचं शाश्वत मार्केट तयार करणं हे खरेच सोपे काम नाही; पण या कृषिमित्रांचा हा प्रश्न व्यवहार्य आहे. यावर विचारविमर्श व्हायलाच हवा. याच विषयाला केंद्रस्थानी ठेवून आपण कलिंगड लागवड व त्यानंतर शेतकऱ्यांची विक्रीसाठी होणारी परवड थांबावी या हेतूने मार्केटिंगसंदर्भात या सदरातून विस्तृत माहिती कृषिमित्रांना, नवउद्योजकांना देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कलिंगड उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारे फळ, तृष्णा (तहान) भागवणारे फळ कलिंगड साधारणपणे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते. कलिंगड आरोग्यास हितकारक, मधूर चवीचे फळ कलिंगड शेतीकडे कोकणातील तरुणांचा, शेतकऱ्यांचा कल हळूहळू वाढतो आहे ही जमेची गोष्ट आहे. नदीपात्रात असणाऱ्या शेतजमिनी भाड्याने घेऊन सामूहिक पद्धतीने किंवा कॅशक्रॉप घेण्याच्या हेतूने शेतकरी, बेरोजगार युवक कलिंगडाचे पीक घेऊन श्रीमंतीची वाट चालण्याच्या हेतूने प्रयत्नशील आहेत; पण त्यांना सारखे प्रश्न भेडसावत असतात ते म्हणजे मार्केटचे.
कलिंगडाचे पीक आल्यानंतर विक्रीचे जाळे विणण्याचा प्रयत्न ते करत असतात; पण मालाला असलेली वाढती मागणी आणि तयार मालाचा पडत चाललेला बाजारभाव यामुळे अगदीच नगण्य किमतीत त्यांना येईल त्या भावाला आपलं फळ विकावं लागतं कारण, फळाचे आकारमान व वजन. फळांची वाहतूक करणे हे मोठे आवाहन या शेतकऱ्यांना असते तसेच प्रत्येक मोक्याच्या ठिकाणी अगोदरच अन्य शेतकऱ्यांनी, फळ विक्रेत्यांनी स्टॉल लावलेले असतात. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेत चांगला धंदा होईल, ही आशा फोल ठरते. या उलट दलालांना, एजंटना, होलसेल फ्रूट सेलरना जास्त फायदा होत असतो कारण, त्यांना कृषी माल पिकवायचा काही एक खर्च नसतो. त्यांना फक्त आपल्याकडे असणाऱ्या जागेचा, वाहनाचा व आपल्या logistics चा वापर करून शेतमाल कमी किमतीत शेतकऱ्यांकडून घेऊन छोट्या-मोठ्या फळविक्रेत्यांना विकून त्यातून फायदा कमवायचा असतो आणि त्यात काही चुकीचेही नाही. कारण, तो त्यांचा व्यवसाय आहे.
कलिंगड लागवड करणाऱ्या कृषी उद्योजकांनी पहिल्यांदा असा विचार मनात रूजवणे आवश्यक आहे की, मी पिकवू शकतो तर निश्चितपणे मी माझा माल विकू शकतो. ही धारणा मनी रूजल्यावर स्वत:च्या क्षमतांचा विचार करून संभाव्य ग्राहकांचा किंवा विपणानाच्या संधींचा आढावा घेणे सोपे होऊ शकते.
संभाव्य मार्केटिंग Strategy काय असू शकतात याचा घेतलेला आढावा....
१. कलिंगड आरोग्यास हितकारक, शीतकारक, बलवर्धक आहे हे आपल्या ग्राहकांपर्यंत पोहचवणारे वेष्टन किंवा कापडी पिशवीवर तसे प्रिंट करून घेऊन आपल्या कलिंगडाचे योग्यप्रकारे ब्रॅण्डिंग करून आपल्या ग्राहकाला पुन्हा पुन्हा कलिंगड खाण्यास आकृष्ट करणे.
२. आपल्या कलिंगडाच्या शेताजवळ हुरडा पार्टी, मोंगा पार्टीसारख्या कलिंगड पार्टी, कलिंगड खाद्य महोत्सव आयोजित करणे.
३. गावातील बचतगटांच्या साहाय्याने गावागावात विक्रीचे जाळे उभारणे
४. आपला स्वतःचा मोक्याच्या ठिकाणी मोबिलाईज फ्रूट स्टॉल लावून फळाच्या स्लाइस करून विकणे.
५. आपल्या फळांच्या विक्रीसाठी शहरातल्या मॉल, फूडस्टोअरसमवेत टायअप् करणे.
६. कलिंगडापासून मूल्यवर्धित पदार्थ तयार करून नंतर ते डिपार्टमेंटल स्टोअर्समधून विकणे.
७. आंब्रेला मार्केटिंग करून महामार्गावरून जाणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करणे.
८. टुरिस्ट कंपन्यांना त्यांना लागणारे फ्रूट सॅलड व्यवस्थित पॅकिंग करून देणे.
९. समजा, १ टन माल विकायचा असेल तर किमान २०० ग्राहक जे कलिंगड अख्खे घेऊ शकतात यांची यादी करून त्यांना व्हॉट्सॲप ग्रुपवरून किंवा स्वत:च्या अॅपवरून जाहिरात करून आकृष्ट करणे.
१०. फ्रूट कार्व्हिंगसाठी लोकांमध्ये अभिरूची वाढवून त्यामार्फत आपली फळे विकण्याचा प्रयत्न करणे
११. शंभर रुपये तिकीट साईझ ठेवून कलिंगडपासून विविध रेसिपी महिलांनी बनवावी म्हणून त्यांना प्रोत्साहित करणे
१२. रसवंतीगृहासारखे कलिंगड थंडाईचे एसटी स्टँडबाहेर, मोक्याच्या ठिकाणी स्वतःचे ज्यूस बार विकसित करणे.
१३. जवळच्या रेल्वेस्टेशनबाहेर माल विक्रीस पाठवणे.
१४. लग्नसमारंभ आयोजित करणारे हॉल, events, अन्य कार्यक्रम यांच्या संयुक्त विद्यमाने आपली फळे विक्री करण्याचा प्रयत्न करणे
१५. समुद्रचौपाटी, पर्यटनस्थळे येथे सहयोगाने, ब्रॅण्डिंग करून स्वतः चे विक्री जाळे उभारणे.
१६. कृषी अभियांत्रिकी, कृषी शास्त्र यांचे प्रशिक्षण घेणाऱ्या मुलांना कलिंगड विक्रीच्या कँपेनमध्ये समाविष्ट करून घेऊन कलिंगड रॅली काढून प्रपोगांडा करून कलिंगडासाठी डिमांड रेज करणे.
१७. आपल्या जवळच्या कृषी पर्यटन चालवणाऱ्या सहयोगी संस्थांच्या साहाय्याने विक्री जाळे वाढवण्याचा प्रयत्न करणे
१८. B२B मध्ये बेव्हरेज इंडस्ट्रीला, घरगुती अर्क काढणाऱ्यांना कन्व्हेंन्स करून अनटॅप मार्केट शोधण्याचा प्रयत्न करणे
१९. कलिंगड प्रक्रिया उद्योग सुरू करण्यास बचतगट व अन्य घटकांना प्रेरित करणे
२०. कलिंगडाच्या सालीपासून जैविक खतनिर्मिती, पशूखाद्य बनवता येईल का याची चाचपणी करून पाहणे.
२१. नारळपाणी जसे दवाखान्याजवळ विकले जाते तसे हे आरोग्यदायी फळ विकण्याचा प्रयत्न करणे
२२. स्थानिक पातळीवर आठवडा बाजार, देवांच्या यात्रा, शिमगोत्सवातून वाढणाऱ्या मागणीचा निपटारा करण्यासाठी होम डिलिव्हरी पर्यायाचा अन्य सहयोगी संस्थांच्या साथीने विकास करणे
--
मार्केटिंग ओपन सिक्रेट (४P)

Marketing मधले ४P इथेही अभ्यासावे लागतात.

* १Pप्रॉडक्ट .. कलिंगड अखंड, स्लाइस, ज्यूस, Carving साठी विकायची फ्रूट, एक्सपोर्ट क्वालिटी माल
* २P प्राईज ... रिजनेबल, पॉकेट फ्रेंडली
* ३P प्लेस (गर्दीची ठिकाणे)
* ४P प्रमोशन ॲप, माऊथ पब्लिसिटी
--
(लेखक उद्योगप्रेरणा प्रशिक्षक आहेत.)

--