लोककला अनुदान शिफारस समिती सदस्यपदी नाईक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लोककला अनुदान शिफारस समिती सदस्यपदी नाईक
लोककला अनुदान शिफारस समिती सदस्यपदी नाईक

लोककला अनुदान शिफारस समिती सदस्यपदी नाईक

sakal_logo
By

81121
मडुरा ः तुषार नाईक यांचा सत्कार करताना आनंद परब. सोबत देवस्थान पदाधिकारी.

नाईक यांचा निवडीनिमित्त सत्कार
बांदा ः राज्य शासनाच्या लोककला अनुदान शिफारस समिती सदस्यपदी नाईक-मोचेमाडकर दशावतार मंडळाचे संचालक तुषार नाईक यांची निवड झाली आहे. त्याबद्दल मडुरा ग्रामस्थांतर्फे देवस्थान समिती अध्यक्ष आनंद परब यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. मडुरा माऊली मंदिर सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला देवस्थान समितीचे पदाधिकारी संतोष परब, सोमनाथ परब, विजय परब, दत्ताराम परब, बाळू गावडे, गुरव, नारायण जाधव आदी उपस्थित होते. सत्काराला उत्तर देताना नाईक यांनी, मडुरा गावाने मला विशेष प्रेम दिले आहे. लोक कलावंतांच्या कलापथकांना प्रयोग अनुदान मंजूर करण्यासाठी शासन निर्णयानुसार समिती गठीत करण्यात आली आहे. दशावतार लोककलेसाठी माझ्यासह देवेंद्र नाईक यांची नियुक्ती झाली आहे. लोककलांना उत्तेजन देणे हा मुख्य उद्देश असून समितीच्या माध्यमातून दशावतार कलेला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे स्पष्ट केले. पोलिसपाटील नितीन नाईक यांनी आभार मानले.