जिल्ह्यात 0 ते 18 वर्षांच्या 3 लाख जणांची तपासणी

जिल्ह्यात 0 ते 18 वर्षांच्या 3 लाख जणांची तपासणी

rat०७६.TXT

(पान २ साठीमेन)

जिल्ह्यात तीन लाख बालकांची तपासणी

जागर पालक, सुदृढ बालक अभियान ; आजारी विद्यार्थ्यांवर तत्काळ उपचार

सकाळ वृत्तसेवा ः
रत्नागिरी, ता. ७ ः जन्मलेल्या बालकांपासून १८ वर्षांपर्यंतच्या विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांचेच आरोग्य सृदृढ राहावे यासाठी बाल सुरक्षा अभियानांतर्गत जागर पालक, सुदृढ बालक अभियान रत्नागिरी जिल्ह्यात राबवले जात आहे. त्यासाठी गावागावामध्ये पथके तयार केली असून जिल्ह्यातील ३ लाख बालकांची तपासणी केली जाणार आहे. त्यातील आजारी विद्यार्थ्यांवर तत्काळ उपचार केले जातील.
जन्मल्यापासून अठरा वर्षापर्यंतच्या बालकांसाठी बाल सुरक्षा अभियान सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण विभागाकडून राबवण्यात येणार आहे. या अभियानात बालके व किशोरवयीन मुलामुलींचे सर्वांगीण आरोग्य तपासणी व लसीकरण केले जाईल. राज्यातील २ कोटी ९२ लाख बालकांची तपासणी होणार असून त्यात जिल्ह्यातील २ लाख ९९ हजार ७५९ बालकांचा समावेश आहे. या अभियानासाठी ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांच्या संख्येनुसार तर शहरी भागात नागरी आरोग्यकेंद्रांच्या संख्येनुसार पथके तयार केली जातील. यामध्ये समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्यसेवक व सेविका, आशा यांचा समावेश राहील. दिवसाला साधारणपणे १५० विद्यार्थ्यांची तपासणी वैद्यकीय अधिकाऱ्‍यांनी करावयाची आहे. अभियानाचा आढावा घेण्यासाठी ग्रामीण व शहरी भागाकरिता जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कृतिदल स्थापन केला आहे.
या मोहिमेत तज्ज्ञांमार्फत तपासणी करणे, आजारी बालकांना त्वरित उपचार मिळवून देणे, प्रतिबंधात्मक आरोग्य सुविधा पुरवणे, सुस्थितीत व सुदृढ आरोग्यासाठी समुपदेशन करणे, पात्र लाभार्थ्यांचे लसीकरण पूर्ण केले जाईल. पहिल्या टप्प्यातील तपासणीत वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ व आरोग्य सेविका यांचा समावेश केला आहे. पुढील टप्प्यात बालरोग, स्त्रीरोग, अस्थिरोग तज्ज्ञ, नेत्र शल्य चिकित्सक, दंतरोग अशा तज्ज्ञांमाफत तपासणी करुन उपचार देतील. तपासणीसाठी शासकीय व खाजगी शाळा व कनिष्ठ महाविद्यालये, आश्रमशाळा, दिव्यांगशाळा, अंगणवाडी, बालवाडी यांचा उपयोग करता येणार आहे. महाविद्यालयात न जाणाऱ्‍या मुलांना प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात तपासणीसाठी नियोजन केले आहे.
बाल सुरक्षा अभियानाची सुरवात ९ फेब्रुवारीला होणार आहे. मार्च २०२३ अखेरीस आठ आठवड्यात तपासणी करावयाची आहे. जिल्ह्यात ६५ प्राथमिक आरोग्य केंद्र असुन त्यानुसार पथकांची स्थापना केली जाणार आहे. या अभियानामार्फत पालकांनी मुलामुलींची तपासणी व लसीकरण करून घ्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले- गावडे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक श्रीमती नयना इंगोले, शिक्षणाधिकारी वामन जगदाळे, श्रीमती सुवर्णा सावंत यांनी केले आहे.
---

१८ वर्षांपर्यंतच्या बालकांची तालुकानिहाय आकडेवारी अशी ः

तालुका*० ते ६ वर्षे*६ ते १८ वर्षे*एकूण
*मंडणगड*२९५१*८१०५*११०५६
*दापोली*२७७४३*७७२१*३५४६४
* खेड*२७६०२*११९२७*३९५२९
* गुहागर*१३८७४*१८८०६*४९३२
* चिपळूण*४६८९२*११२३३*५८१२५
* संगमेश्वर*२४३८४*७१४७*३१५३१
* रत्नागिरी*४४१४८*१७००२*६११५०
* लांजा*१३३३७*४८१०*१८१४७
* राजापूर*१९५८३*६३६८*२५९५१

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com