कुटुंबाला त्रास देणारी चौकशी थांबवा

कुटुंबाला त्रास देणारी चौकशी थांबवा

rat7p20.jpg
81096
राजन साळवी
-------------
एसीबीची कुटुंबाला त्रास देणारी चौकशी
आमदार राजन साळवी; मुलांच्या शाळेचीही घेतली माहिती
रत्नागिरी, ता. ७ः रायगड एसीबीकडून माझ्या मालमत्तेसंदर्भात चौकशी सुरू आहे. त्यांना काय पाहिजे माहिती नाही. मला अडकवायचं असेल तर अडकवा, गुन्हा दाखल करा, अटक करून जेलमध्ये पाठवा. मी कोणत्याही धमकीला घाबरत नाही; परंतु ही कुटुंबाला त्रास देणारी चौकशी थांबवा, अशी विनंती उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे आमदार आणि उपनेते राजन साळवी यांनी केली.
रत्नागिरी दौऱ्यावर असताना पत्रकारांशी झालेल्या चर्चेवेळी त्यांनी भूमिका मांडली. ते म्हणाले, रायगड एसीबीकडून माझ्या मालमत्तेसंदर्भात चौकशी सुरू आहे. त्या अनुषंगाने आमदार झाल्यापासून जिल्हा नियोजनमधील स्थानिक स्तर विकास निधीच्या कामांची चौकशी सुरू आहे. माझी बॅंक खाती, टपालमधील खाती यांची चौकशी झाली. एवढ्यावर थांबले नाहीत तर माझी मुलं ज्या शाळेत शिकली त्याची माहितीदेखील घेतली, असा चौकशीचा उच्चांक गाठला. तरी त्यांचे समाधान झालेले नाही.
रायगड एसीबीकडून मालमत्तेची चौकशी संदर्भात साळवी म्हणाले, गेले काही दिवस रायगड एसीबीकडून मालमत्तेसंदर्भात चौकशी सुरू आहे. यापूर्वी माझ्याबरोबर माझी पत्नी, माझा भाऊ, मुलांचीही चौकशी केली. माझा पीए सुभाष मालप याचीदेखील चौकशी सुरू झाली आहे. एवढेच नाही तर माझ्याशी संबंधित ठेकेदारांचीही चौकशी करण्यात येत आहे. मी आमदार झाल्यापासून म्हणजे २००९ पासून आमदार निधीतून आतापर्यंत किती आमदार निधी खर्च केला आणि आमदार निधीतून किती कामे केली याची वर्षनिहाय माहिती जिल्हा नियोजन विभागाकडे रायगड एसीबीने मागवली आहे. कामाचा ठेका देण्यात आलेल्या ठेकेदाराचे पूर्ण नाव व पत्ता तसेच कामाची अंदाजित रक्कम, ठेकेदाराला कार्यारंभ आदेश दिल्याची तारीख, ठेकेदाराने काम पूर्ण केल्याची तारीख, ठेकेदाराला कामाचे बिल अदा केल्याची तारीख आदी माहिती मागवली आहे. माझी बॅंक खाती, पोष्ट खातीदेखील तपासण्यात आली. माझ्या चौकशीत तुम्हाला काहीही सापडणार नाही; पण तुम्हाला मला अडकवायचे असेल तर जरूर अडकवा. मला अटक करा. मी कोणत्याही धमकीला घाबरत नाही; पण माझ्यामुळे शासकीय यंत्रणा, कुटुंब आणि इतर कोणाला त्रास होता कामा नये, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

चौकट-
बने अडचणीचे ठरतील म्हणून नोटीस
जिल्ह्यातील ज्येष्ठ शिवसैनिक, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष उदय बने यांनादेखील माझ्या चौकशीच्या अनुषंगाने एसीबीने नोटीस पाठवली असल्याची माहिती आहे, असे आमदार साळवी यांनी सांगितले. पुढच्या वेळी विधानसभा निवडणुकीसाठी रत्नागिरी विधानसभा मतदार संघाचे संभाव्य उमेदवार उदय बने असू शकतील. तो उमेदवार त्यांना त्या दृष्टीने जड असेल. त्यामुळे या सरकारला उदय बने यांनाच अडचणीत आणायचे आहे. त्रास देऊन अडकवण्याची भूमिका त्यांची असू शकते, असा माझा आरोप आहे, असे आमदार साळवी यांनी सांगितलं. माझी एसीबीला सहकाऱ्याची भूमिका आहे; परंतु नातेवाईक, पीए, ठेकेदारांना बोलावणे योग्य नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com