चिपळूण-अंध कल्याणसाठी विद्यार्थ्यांनी जमवला 42 हजाराचा निधी

चिपळूण-अंध कल्याणसाठी विद्यार्थ्यांनी जमवला 42 हजाराचा निधी

फोटो ओळी
-ratchl९४.jpg ःKOP२३L८१५५५ चिपळूण ः नॅबकडे अंध कल्याण निधी सुपूर्द करताना सतीविद्यालयाचे शिक्षक, विद्यार्थी
--------
काही सुखद--लोगो

अंध कल्याणसाठी विद्यार्थ्यांनी जमवला ४२ हजारचा निधी
नॅबकडे सुपूर्द ; सतीतील गावांमध्ये मोफत नेत्र तपासणी शिबिर
चिपळूण, ता. ९ ः सती चिंचघरी येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षणमहर्षी स्व. गोविंदराव निकम यांच्या जयंती महोत्सवानिमित्त राष्ट्रीय अंधकल्याण संस्था शाखा चिपळूणतर्फे विद्यालयाच्या परिसरातील सर्व गावांतील नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले. या निमित्ताने अंध कल्याणकरिता विद्यार्थ्यांनी ४१ हजार ६७३ रुपये उत्स्फूर्तपणे निधी जमा केला. अंधाच्या कल्याणासाठी वापरण्यात येणारा हा निधी नॅबचे विकास अधिकारी संदीप नलावडे, प्रशासन अधिकारी भरत नांदगावकर यांच्याकडे सुपूर्द केला.
मुख्याध्यापक संजय वरेकर, उपमुख्याध्यापक अमर भाट, पर्यवेक्षक पांडुरंग काळूगुडे, आसावरी राजेशिर्के या विभागाचे विभागप्रमुख शिवाजी पाटील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत हा निधी देण्यात आला.
विद्यालयाने भरघोस निधी जमा केल्याबद्दल मुख्याध्यापक व शिक्षक यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान केला. प्राथमिक स्वरूपात प्रणय पवार, कार्तिकी पवार, सचिन शेळके, यश माने, वीरेन मोडक, दिक्षिता आवळे तर शिक्षकांमध्ये प्रतिनिधी म्हणून जयसिंग कुंभार यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. सकाळी दहा ते दुपारी एक या वेळेत नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले. यामध्ये विद्यालयाच्या परिसरातील पालक व विद्यार्थ्यांनी शिबिराचा लाभ घेतला. तपासणी शिबिराची संपूर्ण जबाबदारी पर्यवेक्षक पांडुरंग काळूगडे व भाग्यश्री मोघे यांनी यशस्वीपणे पार पाडली. या उपक्रमाचे आमदार शेखर निकम, संचालक शांताराम खानविलकर, सचिव महेश महाडिक, सर्व संचालक मंडळ व परिसरातील ग्रामस्थांनी कौतुक केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com