संक्षिप्त

संक्षिप्त

फोटो ओळी
-rat१०p१०.jpg-KOP२३L८१७४६ जिजा वाघधरे.
----------------
चित्रकला ग्रेड परीक्षेत वाघधरेचे यश
साखरपा ः चित्रकला ग्रेड परीक्षेत कबनूरकर इंग्लिश मीडियम स्कूलने मोठे यश संपादन केले आहे. जिजा वाघधरे हिने ए ग्रेड मिळवली आहे. कला संचालनालयातर्फे घेण्यात आलेल्या एलिमेन्ट्री आणि इंटरमिजिएट परीक्षांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत कबनूरकर इंग्लिश मीडियम स्कूलचा निकाल ९३ टक्के लागला आहे. नववीतील विद्यार्थिनी जिजा हिने एलिमेन्ट्री परीक्षेत ए ग्रेड मिळवत शाळेतून प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. या परीक्षेत कौस्तुभ बने, श्रुष्टी वाजे, हंसिता पांगळे यांनी बी ग्रेड मिळवली आहे. इंटरमिजिएट परीक्षेत पवन गोरूले, भार्गवी सुर्वे आणि साईश्वरी वायकूळ यांनी बी ग्रेड मिळवली आहे. या सर्व विद्यार्थ्यांना कलाशिक्षिका मनीषा जंगम यांनी मार्गदर्शन केले.

पूर शाळेतील शिक्षक मोहिते ठरले ‘महागायक’
देवरूख ः जिल्हा परिषदेच्या वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त महागायक स्पर्धा झाली. यात संगमेश्वर तालुक्यातील डिजिटल आदर्श शाळा पूर येथील उपशिक्षक समीर मोहिते यांची अंतिम विजेता म्हणून निवड झाली. मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांच्या हस्ते ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. मोहिते हे उत्तम गायक, हार्मोनियम वादक असून अभिनयही चांगला करतात. जिल्हा परिषद कर्मचारी यांच्यातील स्नेहभाव वृद्धिंगत व्हावा, दैनंदिन कामकाजात नवीन ऊर्जा मिळावी या अनुषंगाने वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. यात महागायक स्पर्धेत जाधव यांनी विविध गाणी सादर केली. त्यांच्या यशाबद्दल अभिनंदन होत आहे.


फोटो ओळी
-rat१०p१३.jpg-

KOP२३L८१७५१

लांजा ः तालुक्यातील देवधे गवाणे कोलधे रस्त्याची दुरवस्था झाली आहे.

देवधे-कोलधे रस्त्याची दुरवस्था
लांजा ः तालुक्यातील देवधे-गवाणे-कोलधे रस्त्याची दुरवस्था झाली असून हा रस्ता म्हणजे मृत्यूचा सापळा बनला आहे. या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी स्थानिक जनतेतून केली जात आहे. तालुक्यातील देवधेमार्गे गवाणे-कोलधे हा रस्ता सुमारे १० वर्षांपूर्वी पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून करण्यात आला होता. या रस्त्यामुळे तालुक्याचा पश्चिम विभाग जोडला गेला. त्यामुळे पावस, सापुचेतळे, खानवली आदी गावे वाहतुकीच्यादृष्टीने सोयीचे झाले होते. त्यामुळे या मार्गावरून वाहतूक ही वाढलेली आहे; मात्र गेली अनेक वर्षे या रस्त्याची डागडुजी करण्यात आली नसल्याने हा रस्ता म्हणजे मृत्यूचा सापळा बनला असून प्रवास करणे जिकिरीचे बनले आहे. या रस्त्याची साईडपट्टी पूर्णतः उखडली असून रस्त्याच्या मधोमध मोठमोठे खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी खडीदेखील उखडली आहे. या मार्गावर सातत्याने छोटे-मोठे अपघात होत असताना देखील संबंधित विभाग या रस्त्याच्या डागडुजीकडे दुर्लक्ष करताना दिसून येत आहे.

फोटो ओळी
-rat१०p११.jpg ः

KOP२३L८१७४७
लांजा ः लांजा-हर्चे-डोर्ले रस्त्याची झालेली दुरवस्था.

लांजा-डोर्ले रस्त्याची दुरवस्था
लांजा ः गेल्या दहा वर्षांपासून अधिक काळ दुरुस्ती न झाल्याने लांजा, हर्चे, डोर्ले या रस्त्याची अतिशय दुरवस्था झाली आहे. रस्त्यावरील खडी डांबर जाऊन अक्षरशः मातीचा थर दिसू लागला आहे. त्यामुळे विद्यार्थी, गरोदर माता, वृद्धांची गैरसोय होत आहे. इतकी भीषण अवस्था झाली असून त्यामुळे या रस्त्यावरील एसटी वाहतूक बंद पडण्याचा धोका आहे. लांजा, हर्चे, डोर्ले हा तालुक्याच्या पश्चिम भागातील एक महत्वाचा रस्ता आहे. हर्चे या ठिकाणी असलेल्या हायस्कूल तसेच कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षणासाठी राजापूर, लांजा, पावस येथून विद्यार्थी येत असतात; मात्र डोर्ले या रस्त्याची गेल्या दहा वर्षांमध्ये दुरुस्ती किंवा डांबरीकरणाचे काम न झाल्याने संपूर्ण रस्ता हा खड्डेमय झाला असून काही ठिकाणी रस्त्यावरील खडी वाळू जाऊन त्याखालील मातीचा थर दिसू लागला आहे. इतकी बिकट अवस्था रस्त्याची झाल्याने येथील विद्यार्थी, गरोदर महिला, वृद्धांची प्रचंड गैरसोय होत आहे. हर्चे हे गाव लांजा तालुक्याच्या सीमेवर आणि रत्नागिरी तालुक्याच्या जवळ वसले आहे. त्यामुळे दोन तालुक्याच्या कार्यक्षेत्रांच्या मधोमध येणाऱ्या या गावामुळे या रस्त्याकडे सगळ्यांचे दुर्लक्ष झालेले दिसून येत आहे. त्यामुळे या रस्त्याचे तातडीने डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते तरळ यांनी केले आहे. तसेच या रस्त्याच्या दुरवस्थामुळे भविष्यात या रस्त्यावरील एसटीदेखील बंद पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
---

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com