सेजलच्या चित्राची ‘स्टँम्प डिझाइन’साठी निवड

सेजलच्या चित्राची ‘स्टँम्प डिझाइन’साठी निवड

81886
कुडाळ ः सिंधुदुर्गचे डाक अधीक्षक मयुरेश कोले यांनी कुडाळ हायस्कुलमध्ये जाऊन सेजलला प्रमाणपत्र, पारितोषिक दिले.
81887
कुडाळ ः सेजल हिने स्वातंत्र्योत्तर भारताची प्रगती या विषयावर रेखाटलेले चित्र. (छायाचित्रे ः अजय सावंत)


सेजलच्या चित्राची ‘स्टँम्प डिझाइन’साठी निवड

कुडाळ हायस्कूलची विद्यार्थिनी;‘स्वातंत्र्योत्तर भारताची प्रगती’कडे वेधले लक्ष

कुडाळ, ता. ११ ः आजादी का अमृत महोत्सवानिमित्त डाक विभागामार्फत घेण्यात आलेल्या स्टँम्प डिझाइन चित्रकला स्पर्धेत कुडाळ हायस्कूल ज्युनियर कॉलेजच्या सेजल पवार (रा. झाराप) हिच्या चित्राची स्टॅम्पसाठी निवड झाली. राज्यातून केवळ पाच विद्यार्थ्यांच्या चित्रांना हा बहुमान मिळाला असून त्यात सेजलच्या चित्राचा समावेश आहे. ‘स्वातंत्र्योत्तर भारताची प्रगती’ विषयावर तिने चित्र रेखाटले होते. त्यात कोविड लसीकरण, जीडीपी, बुलेट ट्रेन, अंतरिक्ष प्रगती, खेळ, शिक्षण या क्षेत्रातली प्रगती चित्राच्या माध्यमातून दाखवली होती.
सिंधुदुर्गचे डाक अधीक्षक मयुरेश कोले यांनी आज कुडाळ हायस्कूलमध्ये जाऊन सायलीला प्रमाणपत्र आणि पारितोषिक प्रदान केले. शाळा आणि संस्थेतर्फेही सेजलचे अभिनंदन होत आहे. आजादी का अमृत महोत्सवानिमित्त देशभरात विविध स्पर्धा झाल्या. डाक विभागातर्फेही स्टॅम्प डिझाइन स्पर्धा घेतली. यात राज्यभरातील हजारो विद्यार्थी सहभागी झाले. विविध विषयांवर त्यांनी चित्र काढून पाठवली होती. या स्पर्धेत सेजलच्या चित्राची निवड झाली. हजारो स्पर्धकांनी पाठवलेल्या चित्रातून केवळ पाच चित्रांची निवड झाली. त्यात सेजलच्या चित्राचा समावेश आहे. डाक अधीक्षक कोले यांनी कुडाळ हायस्कुलमध्ये जाऊन सेजलला प्रमाणपत्र, रोख दोन हजार देऊन तिचे अभिनंदन केले. मुख्याध्यापक दादा शिरहट्टी आणि उपस्थित शिक्षकांच्या हस्तेही तिचे अभिनंदन करण्यात आले. त्यांनतर कमशिप्र मंडळातर्फेही संस्था पदाधिकारी अनंत वैद्य यांनी सेजलचे अभिनंदन केले. यावेळी राजकिशोर हावळ, दिनेश आजगावकर, सेजलचे मार्गदर्शक शिक्षक संदीप चिऊलकर, श्री. ठाकूर आदी उपस्थित होते. आपल्या यशाचे श्रेय सेजलने कलाशिक्षक संदीप चिऊलकर यांना दिले.
------------
चौकट
कुडाळ हायस्कूलच्या शिरपेचात मनाचा तुरा
अलीकडेच कुडाळ हायस्कुलची विद्यार्थिनी शमिका चिपकरने पोहण्यात विश्वविक्रम केला होता. भालाफेकमध्ये विशाल राणे या विद्यार्थ्याने राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी केली होती आणि आता सेजल पवारने मिळवलेल्या राज्यस्तरीय यशाने कुडाळ हायस्कुलच्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा रोवला गेला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com