वैश्य समाजबांधवांच्या सदैव पाठीशी
वैश्य समाजबांधवांच्या सदैव पाठीशी

वैश्य समाजबांधवांच्या सदैव पाठीशी वैश्य समाजबांधवांच्या सदैव पाठीशी

82269
सावंतवाडी : शालेय शिक्षणमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल दीपक केसरकर यांचा सिंधुदुर्ग जिल्हा वैश्यवाणी समाज बांधवांतर्फे सत्कार करण्यात आला. (छायाचित्र ः रुपेश हिराप)

वैश्य समाजबांधवांच्या सदैव पाठीशी

मंत्री दीपक केसरकर ः सावंतवाडीत शतक महोत्सवी सोहळ्यात सत्कार

सावंतवाडी, ता. १२ ः वैश्य समाज सक्षम झाला पाहिजे. त्यासाठी आमचा नेहमीच प्रयत्न आहे. भेदभाव न करता समाजातील बांधवांनी एकत्र येणे गरजेचे आहे. समाज एकत्र आल्यास कोणतीही शक्ती आपल्याला मागे खेचू शकत नाही. समाजबांधवांबरोबर माझी बांधिलकी नेहमीच राहणार असून मनाने मी नेहमीच समाजासोबत आहे. समाजाच्या वसतिगृहाच्या बांधकामातील पहिल्या पाच खोल्यांचा खर्च माझ्या कुटुंबाच्या वतीने उचलला जाईल, अशी ग्वाही शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे दिली.
वैश्य समाज सावंतवाडी आणि वैश्यवाणी समाज कमिटी सिंधुदुर्ग यांचा शतक महोत्सवी सोहळा व ३५ वा वधू-वर परिचय मेळावा येथील वैश्य समाज हॉलमध्ये पार पडला. कार्यक्रमाच्या उद्‍घाटनप्रसंगी मंत्री केसरकर बोलत होते. राज्याच्या शिक्षणमंत्रिपदी त्यांची निवड झाल्याने समाजाच्या वतीने त्यांचा यावेळी जाहीर झाला. व्यासपीठावर भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, अखिल गोमंतक वैश्य परिषद अध्यक्ष सुभाष मसूरकर, वैश्यवाणी समाज, बेळगावचे अध्यक्ष दत्ता कणबर्गी, वैश्य समाज सिंधुदुर्गचे अध्यक्ष सुनील भोगटे, सावंतवाडी अध्यक्ष रमेश बोंद्रे, अॅड. दिलीप नार्वेकर, भार्गवराम धुरी, गणेश बोर्डेकर, पुष्पलता कोरगावकर आदी उपस्थित होते.
राजन तेली म्हणाले, ‘‘आजही वैश्य समाजाला आपण कुठल्या समाजात आहोत, हे माहीत नाही. वैश्य म्हणजेच वाणी आणि वाणी म्हणजे वैश्य याबाबत आजही खटला सुरू आहे. येणाऱ्या काळात याबाबत उच्च न्यायालयात लढाई लढावी लागेल. राज्याच्यावतीने जे काही सहकार्य पाहिजे, ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देण्याची ग्वाही दिली आहे. जिल्ह्याच्या बाजारपेठांचा विचार करता येथील व्यापारी बांधवांनी बाजारपेठेतील गाळे कोणाला दिले आहेत, याचा विचार करावा. मोपा, चिपी येथे दिल्लीतील माणसे येऊन बसल्यानंतर आपल्याला त्यांच्या हाताखाली काम करावे लागणार आहे. त्यामुळे युवकांनी जास्तीत जास्त शिक्षणावर भर देऊन भविष्यात मोठे होण्याचे स्वप्न पाहा. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी जिल्ह्यातील ‘क’ वर्ग दर्जाच्या आठ वाचनालयांमध्ये एमपीएससी, यूपीएससी मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यासाठी निधी उपलब्ध केला आहे. त्याचा लाभ येथील विद्यार्थ्यांनी घ्यावा.’’ संदेश पारकर म्हणाले, ‘‘वैश्य समाजाने नेहमीच सामाजिक भान राखले आहे. वृत्ती, कर्तृत्व, दातृत्व म्हणजेच वैश्य समाज, असेही म्हणता येईल. काही ठिकाणी वैचारिक मतभेदही असतील; परंतु हे मतभेद बाजूला सारून समाजासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. ’’ सावंतवाडी तालुकाध्यक्ष रमेश बोंद्रे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी जिल्हाध्यक्ष भोगटे, सुभाष मसूरकर, दत्ता कणबर्गी यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी गीतेश पोकळे, समीर वंजारी, साक्षी वंजारी, अस्मिता बांदेकर, कीर्ती बोंद्रे, बिपिन कोरगावकर, बाळू अंधारे, सदानंद मयेकर, सुनील दुबळे, आनंद नेवगी, राकेश नेवगी, अन्नपूर्णा कोरगावकर आदी उपस्थित होते.
..............
चौकट
घड्याळाकडे बघणे थांबवा..
समाजाला वेळ दिल्यानंतर तेथे थांबणे गरजेचे आहे. दरवेळी घड्याळाकडे बघून ‘मला विमान पकडायचं आहे’ हे थांबलं पाहिजे. आम्हालाही कामे असतात, कोण रिकामटेकडा नाही, असा टोला राजन तेली यांनी मंत्री केसरकर यांचे नाव न घेता लगावला. राज्य सरकारमध्ये स्थान असूनही समाजासाठी फायदा करून देता येत नाही, ही मोठी खंत असल्याची टिकाही त्यांनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com