रत्नागिरी-मुकबधिर युवकांना उपजीविकेसाठी कायमस्वरुपाचा पर्याय

रत्नागिरी-मुकबधिर युवकांना उपजीविकेसाठी कायमस्वरुपाचा पर्याय

फोटो ओळी
- rat१२p३०.jpg- रत्नागिरी ः मूकबधीर युवकांच्या पालकांशी चर्चा करताना पालकमंत्री उदय सामंत.
-----------
मुकबधिर युवकांना उपजीविकेसाठी कायमस्वरुपाचा पर्याय
पालकमंत्री सामंत ः पुढील महिन्यात स्वतंत्र बैठक घेणार
रत्नागिरी, ता. १२ : मूकबधीर युवकांना योग्य ती संधी मिळण्यासाठी नेमके काय करता येईल, यासाठी येत्या काही दिवसात स्वतंत्र बैठक घेऊन पुढील एक महिन्याच्या कालावधीत युवकांच्या उपजीविकेसाठी कायमस्वरूपी पर्याय उपलब्ध करून दिला जाईल, असे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
रत्नागिरी शहरातील शिर्के प्रशाला येथे भव्य रोजगार महामेळाव्याचे उद्घाटन पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले. त्यावेळी एका कार्यकर्त्याने पालकमंत्री सामंत यांना सांगितले की या रोजगार महामेळाव्यानिमित्त काही मूकबधिर युवक या ठिकाणी आले आहेत. मात्र ते मूकबधिर असल्याने त्यांना कोणते काम द्यायचे, कोणती नोकरी द्यायची हा प्रश्न सर्वांसमोर उभा आहे. पालकमंत्र्यांनी या मूकबधिर युवकांसाठी तत्काळ बैठक आयोजित केली. त्या सर्व युवकांची व त्यांच्यासह आलेल्या त्यांच्या पालकांशी पालकमंत्री सामंत यांनी संवाद साधला. या युवकांना कशा प्रकारे नोकरी देता येईल, त्यांच्या कायमस्वरूपी उपजीविकेसाठी काय करता येईल, यावर पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी एम. डी. देवेंदर सिंह, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी, रत्नागिरी जिल्हा कौशल्य विकास सहायक आयुक्त इनुजा शेख, औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रादेशिक अधिकारी वंदना खरमाळे, राहुल पंडित तसेच युवा हबचे संचालक किरण रहाणे यांच्याशी चर्चा केली. मुकबधीर युवकांकडे कौशल्य, बुद्धी असूनही त्यांना योग्य संधी मिळत नाही. या युवकांना योग्य ती संधी मिळण्यासाठी नेमके काय करता येईल, यासाठी येत्या काही दिवसातच स्वतंत्र बैठक घेऊन पुढील एक महिन्याच्या कालावधीत या युवकांच्या उपजीविकेसाठी कायमस्वरूपी पर्याय उपलब्ध करून दिला जाईल, असे पालकमंत्री सामंत यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com