सावंतवाडी येथे विद्युत खांब 
मुळातून तुटल्याने धोकादायक

सावंतवाडी येथे विद्युत खांब मुळातून तुटल्याने धोकादायक

82336
सावंतवाडी ः पत्रकार कॉलनी येथील धोकादायक विद्युत खांब.

सावंतवाडी येथे विद्युत खांब
मुळातून तुटल्याने धोकादायक
सावंतवाडी ः शहरानजीक पत्रकार कॉलनी गोठण भोसले मार्गाजवळ महावितरणाचा विद्युत खांब मुळातून तुटला असून झाडाच्या आधाराने उभा आहे. येथील नागरिकांनी कळवूनही अद्याप महावितरणने त्याची दखल घेतलेली नाही. या खांबावरून विद्युत प्रवाह सुरू असल्याने दुर्घटनेची दाट शक्यता आहे. विद्युत वितरणकडून धोकादायक खांब बदलण्याबाबत चालढकल सुरू आहे. जीवित हानी झाल्यास किंवा काहीही चुकीचा प्रकार घडल्यास त्याला महावितरणचे अधिकारी जबाबदार राहतील, असा इशारा मनसेचे माजी शहर उपाध्यक्ष तथा विद्यार्थी सेनेचे उपतालुकाध्यक्ष प्रवीण गवस यांनी दिला. यासाठी वेळप्रसंगी नागरिकांना घेऊन आंदोलन छेडू, असेही गवस म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com