मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या वेंगुर्लेत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या वेंगुर्लेत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या वेंगुर्लेत

शिक्षक समितीचे महाअधिवेशन; पूर्वनियोजन अंतिम टप्प्यात

कुडाळ, ता. १४ ः महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य महाअधिवेशन वेंगुर्ले येथे गुरुवारी (ता. १६) होणार आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती शिक्षक समितीचे राज्य उपाध्यक्ष राजन कोरगावकर यांनी दिली.
कोरगावकर म्हणाले, ‘‘शिक्षक समितीच्या राज्य अधिवेशनाचे महिनाभरापूर्वी बिगुल वाजताच अवघ्या महाराष्ट्रात समिती सदस्यांमध्ये उत्साह संचारला आहे. सिंधुदुर्ग या पर्यटन जिल्ह्यात निसर्गसौदर्यांची खाण असलेल्या वेंगुर्ल्यात राज्य महाअधिवेशन होत असताना त्याची जय्यत तयारी सुरू आहे. पूर्वेकडे टोकाला असलेल्या गडचिरोली ते उत्तरेकडील धुळे, नंदुरबार जिल्हे व राज्य़ातील उर्वरित सर्व जिल्ह्यांतील सदस्यांनी मोठ्या संख्येने अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठीची नियोजनबद्ध तयारी सुरू आहे. संघटना पदाधिकारी प्रत्येक आघाडीवर जोमाने जबाबदारी पार पाडत आहेत. महाअधिवेशन यशस्वी आणि अभूतपूर्व होण्यासाठी तळागाळातील सामान्य कार्यकर्त्यांपासून ते नेतृत्व करणाऱ्या राज्य पदाधिकाऱ्यापर्यंत वेगाने आणि नियोजनबध्दतेने काम सुरू आहे. अधिवेशन यशस्वी होण्यासाठीचा महत्त्वाचा भाग म्हणजे अधिवेशनकालीन रजा मंजुरीसाठीचे प्रयत्न गेला महिनाभर सुरू आहेत. पहिल्या फळीतील पदाधिकाऱ्यांनी प्रशासकीय मुख्यालय, मुंबई येथे गेले दोन दिवस ठाण मांडून मंत्री आणि अधिकारी स्तरावर किमान रजा मंजुरीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळाले आहे. या महाअधिवेशासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे, ग्रामविकासमंत्री गिरिष महाजन, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, उद्योगमंत्री उदय सामंत, बंदरे आणि खणिकर्ममंत्री दादा भुसे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. त्याबरोबरच खासदार, आमदार यांचीही उपस्थिती राहणार आहे. अधिवेशन रजा मंजुरी आणि प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीसाठी राज्य उपाध्यक्ष कोरगावकर यांच्यासह सुधाकर सावंत, राज्य सहसचिव नामदेव जांभवडेकर, रायगड जिल्हा नेते किशोर पाटील, सिंधुदुर्गचे नेते नंदकुमार राणे या पदाधिकाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले. पूर्वनियोजित अधिवेशन दिमाखात पार पडणार असून अवघ्या महाराष्ट्रातील सुमारे एक ते दीड लाख पाईक उपस्थित राहत आहेत. त्यामुळे पुनः एकदा सिंधुदुर्ग दुमदुमणार आहे. या अधिवेशनासाठी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या विशेष सहकार्याबद्दल विशेष आभार व्यक्त करत आहोत, असे कोरगावर म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com