देवरूख ः बंद विच्छेदन कक्षामुळे मृतदेहांची होतेय हेळसांड

देवरूख ः बंद विच्छेदन कक्षामुळे मृतदेहांची होतेय हेळसांड

फोटो ओळी
-rat१४p८.JPG ः KOP२३L८२६५३
देवरूख ः बंद असलेले शवविच्छेदन कक्ष.
------------

बंद विच्छेदन कक्षामुळे
मृतदेहांची होतेय हेळसांड
देवरूख ग्रामीण रुग्णालयाची अवस्था ; लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
देवरूख, ता. १४ ः येथील ग्रामीण रुग्णालयाच्या बंद शवविच्छेदन कक्षाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बंद कक्षामुळे मृतदेहांची फरफट होत असून, विच्छेदनासाठी संगमेश्वरला हेलपाटा मारावा लागत आहे. स्थानिक राजकीय प्रतिनिधीही याबाबतीत उदासीन असून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण म्हणून देवरूख परिचित आहे. येथील ग्रामीण रुग्णालयावर आजूबाजूच्या ४० पेक्षा अधिक गावातील नागरिक अवलंबून आहेत. या रुग्णालयाच्या नूतन इमारतीचे काम सुरू असल्याने सध्या रुग्णालयाचा कारभार शाळा क्र. ३ समोरील शासकीय इमारतीतून चालवला जात आहे. इथेही जागेअभावी रुग्णांची परवड होत आहे. अशातच बंद असलेल्या शवविच्छेदन कक्षामुळे मृतदेहांचे हाल होत आहेत. अपघात, आत्महत्या किंवा इतर प्रकारातील देहांचे विच्छेदन करावे लागते यासाठी हा कक्ष असला तरी सध्या तो शोभेची इमारत बनून राहिला आहे. विशेष म्हणजे यापूर्वी कक्षाची दुरवस्था झाल्याने तो बंद होता. त्यानंतर याला निधी मंजूर होऊन येथे नवीन इमारत बांधण्यात आली तरीही हा कक्ष बंदच असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
याचा फटका मृतांच्या नातेवाइकांना बसत असून मृतदेह संगमेश्वरला न्यावा लागत आहे. संगमेश्वरला वैद्यकीय अधिकारी उपलब्ध असल्यास तातडीने पुढील सोपस्कार होतात; मात्र अनेकदा अधिकाऱ्यांअभावी नातेवाइकांना तासनतास ताटकळत बसावे लागते. या तापाबरोबरच देवरूख ते संगमेश्वर हे १९ किलोमीटरचे अंतर याचा आर्थिक फटकाही सोसावा लागतो. मृतदेह आणल्यास रुग्णवाहिका उपलब्ध असेल तर तो संगमेश्वरला नेला जातो नाहीतर इथेही वाट पाहत थांबावे लागते. गेल्या ६ महिन्यात असे प्रकार अनेकदा घडले आहेत. यापूर्वी देवरूख ग्रामीण रुग्णालयाची सुसज्ज इमारत व्हावी म्हणून राजकीय पक्षांनी अंदोलने केली. आता नव्याने झालेला विच्छेदन कक्ष सुरू होण्यासाठी राजकीय पक्षांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com