मुख्याध्यापक नाईक यांना
वाडा-देवगड येथे पुरस्कार

मुख्याध्यापक नाईक यांना वाडा-देवगड येथे पुरस्कार

82753
देवगड ः संजय नाईक यांना उपक्रमशील मुख्याध्यापक पुरस्कार प्रदान करताना शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे.

मुख्याध्यापक नाईक यांना
वाडा-देवगड येथे पुरस्कार
मालवण, ता. १४ : सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळामार्फत दिला जाणारा उपक्रमशील मुख्याध्यापक पुरस्कार तालुक्यातील वराडकर हायस्कूल, कट्टाचे मुख्याध्यापक संजय नाईक यांना नुकताच अनंत केळकर हायस्कूल, वाडा-देवगड येथे प्रदान करण्यात आला.
यावेळी शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, महाराष्ट्र गणित अध्यापक मंडळाचे कार्यवाह शिवशरण बिराजदार, प्रवीण आंबोळे, डॉ. दीपक शेटे, सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळ अध्यक्ष वामनराव खोत, सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळ कार्यवाह तुकाराम पेडणेकर, औदुंबर भागवत, अनंत केळकर हायस्कूल वाडाचे मुख्याध्यापक नारायण माने, तालुका गणित अध्यापक मंडळ अध्यक्ष प्रसाद कुबल आदी उपस्थित होते. सिंधुदुर्ग गणित अध्यापक मंडळाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणित संबोध, प्राविण्य, गणित प्रज्ञा परीक्षा अशा अनेक परीक्षा यशस्वीपणे आयोजित केल्या जातात आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा देखील सत्कार केला जातो. शिक्षकांसाठी चर्चासत्रे, शिबिरे आयोजित केली जातात. उपक्रमशील गणित शिक्षक, उपक्रमशील मुख्याध्यापक अशाप्रकारे गणित विषयासाठी सतत कार्यशील असणाऱ्यांचा बहुमान गणित मंडळांच्यावतीने करण्यात येतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com