कोलगावमध्ये बुद्धिबळ स्पर्धेस प्रतिसाद

कोलगावमध्ये बुद्धिबळ स्पर्धेस प्रतिसाद

82918
कोलगाव ः येथे आयोजित जिल्हास्तरीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेतील विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

कोलगावमध्ये बुद्धिबळ स्पर्धेस प्रतिसाद

९० जणांचा सहभाग; ईस्वटी मंडळ, मुक्ताई ॲकॅडमीचा उपक्रम

सावंतवाडी, ता. १५ ः श्री ईस्वटी कला, क्रीडा मंडळ, कोलगाव-भोमवाडी आणि मुक्ताई ॲकॅडमी, सावंतवाडी यांच्या संयुक्त विदयमाने कोलगाव माध्यमिक विदयालय येथे आयोजित जिल्हास्तरीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सरपंच संतोष राऊळ यांच्या हस्ते उद्‍घाटन झाले.
यावेळी मुक्ताई ॲकॅडमीचे अध्यक्ष कौस्तुभ पेडणेकर, उदयोजक प्रवीण सावंत, कोलगाव विकास सोसायटीचे संचालक लक्ष्मण राऊळ, माजी सैनिक किरण सावंत, शिक्षक अरविंद मेस्त्री, सर्कल जगन्नाथ साईल, मुख्याध्यापिका ढोके, अंगणवाडी सेविका पूर्वा सावंत, तृप्ती साईल, साक्षी धोंड, किसन राऊळ, महेश सावंत, अक्षय साईल, मंगलदीप पवार, आनंद कासार, राजा सावंत आदी उपस्थित होते.
जिल्हाभरातील नव्वद स्पर्धकांनी स्पर्धेत सहभाग घेतला. प्रामुख्याने पाच वर्षांच्या मुलांपासून ज्येष्ठही स्पर्धेत सहभागी झाले. आठ आंतरराष्ट्रीय मानांकित स्पर्धकांनीही उपस्थिती दर्शविली. यावेळी विश्वविजेता विश्वनाथन आनंद यांच्या कोचिंग कँपमध्ये कोकणातून निवड झालेला सावंतवाडीचा एकमेव राष्ट्रीय खेळाडू बाळकृष्ण पेडणेकर, कोलगावचा आठ वर्षीय राष्ट्रीय खेळाडू यश प्रवीण सावंत, या वर्षीच्या शालेय कॅरम स्पर्धेत सातत्याने प्रथम क्रमांक पटकावून राष्ट्रीय स्तरावर निवड झालेली सावंतवाडीची साक्षी रामदूरकर आणि पन्नास टक्के दृष्टिदोष असलेला मालवणचा मयुरेश परुळेकर या ॲकॅडमीच्या विद्यार्थ्यांचा मंडळातर्फे विशेष सत्कार झाला. ॲकॅडमीचे अध्यक्ष पेडणेकर यांनी कोलगावमधील विद्यार्थ्यांसाठी पुढील कालावधीत उपक्रम राबविणार असल्याचे सांगितले. पूर्वा सावंत यांनी आभार मानले.

स्पर्धेचा निकाल अनुक्रमे असा
खुला गट-संदेश गवंडी (देवगड), सुश्रुत नानल (कणकवली), बाळकृष्ण पेडणेकर (सावंतवाडी), मिहीर सकपाळ (देवगड), अभिषेक सांगळे (देवगड). विशेष दिव्यांग-मयुरेश परुळेकर (मालवण), राजाराम पाताडे (सुकळवाड). १५ वर्षे मुले-सोहम देशमुख (सावंतवाडी), अनुज व्हनमाने (कुडाळ), आर्यन सामंत (भोगवे). १५ वर्षे मुली-साक्षी रामदूरकर (सावंतवाडी), भूमी कामत (सावंतवाडी), सौम्या हरमलकर (सावंतवाडी), १० वर्षे मुले-यश सावंत (कोलगाव), गौरांग टोपले (सावंतवाडी), अवनिश वेंगुर्लेकर (कोलगाव). १० वर्षे मुली-गार्गी सावंत (कोलगाव), निधी गवस (सावंतवाडी), पलक पाटणकर (सावंतवाडी).

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com