मळगाव ग्रामसचिवालयाचे रविवारी उद्‌घाटन

मळगाव ग्रामसचिवालयाचे रविवारी उद्‌घाटन

82919
मळगाव ग्रामसचिवालय

मळगाव ग्रामसचिवालयाचे रविवारी उद्‌घाटन
सावंतवाडी ः मळगाव ग्रामसचिवालयाच्या नूतन इमारतीचे उद्‌घाटन शिवजयंती दिनी रविवारी (ता. १९) होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर असून उद्‌घाटन आमदार नीतेश राणे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राजन तेली, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, माजी जिल्हा परिषद सदस्य उत्तम पांढरे, माजी पंचायत समिती सदस्य रुपेश राऊळ, माजी सभापती राजेंद्र परब, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांची प्रमुख उपस्थिती आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन मळगाव सरपंच स्नेहल जामदार, उपसरपंच हनुमंत पेडणेकर, ग्रामविकास अधिकारी संदीप गोसावी आदींनी केले आहे.
................
कुडाळमध्ये रविवारी रेकॉर्ड डान्स स्पर्धा
कुडाळ ः साई कला, क्रीडा मंडळ नाबरवाडी व नगरसेविका श्रेया गवंडे यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (ता. १९) नाबरवाडी, कुडाळ येथे शिवजयंती उत्सवानिमित्त रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन केले आहे. रविवारी सकाळी ९ वाजता शिवज्योतीचे आगमन, १० वाजता शिवप्रतिमेचे पूजन, दुपारी ३ वाजता मुलांसाठी क्रीडा स्पर्धा (लहान गट ४ ते ८ वर्षे आणि मोठा गट ८ ते १४ वर्षे), सायंकाळी ५ वाजता महिलांसाठी खेळ, ७ वाजता रेकॉर्ड डान्स स्पर्धा दोन गटांत होणार आहे. मोठ्या गटासाठी (१६ वर्षांपुढील) ३०००, २०००, १००० रुपये, तर लहान गटासाठी (१५ वर्षे पूर्ण व त्याखालील) २०००, १५००, ५०० रुपये अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com