रत्नागिरी- प्रथमच रेटिना तपासणी शिबिर

रत्नागिरी- प्रथमच रेटिना तपासणी शिबिर

इन्फिगोतर्फे आज गणपतीपुळ्यात
प्रथमच रेटिना तपासणी शिबिर
रत्नागिरी, ता. १५ : इन्फिगो आय केअर हॉस्पिटलच्यावतीने गुरुवारी (ता. १६) गणपतीपुळे येथे आणि शुक्रवारी (ता. १७) वाटद- खंडाळा येथे प्रथमच मधुमेही व्यक्तींसाठी डोळ्याच्या पडद्याची (रेटीना) तपासणी शिबिर आयोजित केले आहे. यामध्ये इन्फिगोचे प्रसिद्ध रेटीनातज्ज्ञ डॉ. प्रसाद कामत उपचार करण्यासाठी उपलब्ध राहणार आहेत. या भागातील रुग्णांसाठी ही प्रथमच संधी उपलब्ध झाली आहे.
गणपतीपुळे येथील श्री देव संस्थांनच्या भक्तनिवास येथे सकाळी १० ते दुपारी ३ तर १७ ला वाटद- खंडाळा येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात सकाळी १० ते सायंकाळी ५ या कालावधीत हे तपासणी शिबिर होणार आहे. जिल्ह्यात सर्वात सुसज्ज व आधुनिक असा रेटिना विभाग इन्फिगो आय केअरच्या रत्नागिरीतील हॉस्पिटलमध्ये आहे. आजवर हजारो रेटिनाच्या रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. प्रसिद्ध शंकर नेत्रालय (चेन्नई) येथून प्रशिक्षित इन्फीगो हॉस्पिटलचे रेटिना विभागप्रमुख डॉ. प्रसाद कामत यांनी शेकडो अधिक गुंतागुंतीच्या रेटिना शस्त्रक्रियाही रत्नागिरीत केल्या आहेत.
शिबिरामध्ये डोळ्यांच्या पडद्याची संपूर्ण तपासणी तसेच आवश्यक असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार थ्री डी ओसीटी स्कॅन तपासणी केली जाणार आहे. यामुळे मधुमेही व्यक्‍तींच्या रेटिनाचे उपचार करण्यासाठी मुंबई, पुणे, कोल्हापूर येथे जाण्याचा खर्च व वेळ वाचणार आहे. या भागातील रुग्णांसाठी ही तपासणी येथेच होणार आहे. अनेक दिवसांपासून मधुमेह आहे त्यांनी आपले डोळे वेळीच तज्ज्ञांकडून तपासून घ्यावेत. नाव नोंदणीसाठी रुग्णालयाशी संपर्क साधावा आणि या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन इन्फिगो आय केअर हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकूर यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com