Tue, March 21, 2023

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर
आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर
Published on : 15 February 2023, 3:50 am
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर
सिंधुदुर्गनगरी, ता. १५ ः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या (ता.१६) जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. ते वेंगुर्ले येथील शिक्षक समितीच्या अधिवेशनाला उपस्थित राहतील.
त्यांचा दौरा असा ः सकाळी १०.३० वाजता चिपी विमानतळ येथे आगमन व मोटारीने वेंगुर्लेकडे प्रयाण, सकाळी ११ वाजता राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे अधिवेशन व शिक्षण परिषदेस उपस्थिती, दुपारी १२ वाजता मोटारीने वेंगुर्ला बंदराकडे प्रयाण. दुपारी १२.१५ वाजता वेंगुर्ला बंदर येथील झुलत्या पुलाचा व निशाण तलाव टप्पा-२ चा लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती, दुपारी १२.४५ ते १.०५ वाजता राखीव, दुपारी १.०५ वाजता मोटारीने चिपी विमानतळाकडे प्रयाण, दुपारी १.३५ वाजता चिपी विमानतळ येथे आगमन व विमानाने जळगावकडे प्रयाण.