सोनुर्ली येथे सोमवारपासून ‘विज्ञान जत्रा’

सोनुर्ली येथे सोमवारपासून ‘विज्ञान जत्रा’

सोनुर्ली येथे सोमवारपासून ‘विज्ञान जत्रा’
सावंतवाडी ः श्री देवी माऊली शिक्षण प्रसारक मंडळ, सोनुर्ली संचलित माऊली माध्यमिक विद्यालय, सोनुर्ली येथे २० व २१ ला सकाळी ११ ते ४ या वेळेत विज्ञान जत्रा हा कार्यक्रम आयोजित केला आहे. यामध्ये गोवा सायन्स सेंटर, पणजी यांचे ‘सायन्स ऑन व्हील’चे प्रयोग, स्टेम लर्निंग मुंबई यांचे कृतियुक्त प्रयोग, वसुधंरा विज्ञान केंद्र नेरुरपार यांची फिरती प्रयोगशाळा, फिल्म शो, आकाशदर्शन, शालेय विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक रांगोळ्या, पर्यावरण सरंक्षण, पोस्टर प्रदर्शन, सीसीआरटी, आझादी का अमृत महोत्सवनिमित्त ‘अनटोल्ड स्टोरीज ऑफ फ्रीडम फायटर’ कार्यक्रम होणार आहे. वैज्ञानिक माहितीचा लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष अनंत परब, शालेय समिती अध्यक्ष नागेश गावकर, मुख्याध्यापक जी. एस. मोर्ये यांनी केले आहे.
...............
बांदा-वेंगुर्ले बसच्या वेळेत बदल
सावंतवाडी ः मळेवाड-कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे यांच्या मागणीला अखेर यश आले असून बांद्याहून वेंगुर्ले येथे जाणाऱ्या गाडीची वेळ वाढवून देण्यात आली आहे. मळेवाड-कोंडुरे उपसरपंच मराठे यांनी मुलांची परवड होत असल्याने एसटी फेऱ्यांच्या वेळेत बदल करण्याच्या मागणीचे पत्र वेंगुर्ले आगार व्यवस्थापक विशाल शेवाळे यांना दिले होते. यात बांदा येथून दुपारी ३.१५ ला सुटणारी बांदा ते वेंगुर्ले या गाडीची सुटण्याची वेळ अर्धा तास वाढवून देण्याची मागणी केली होती. ही मागणी एसटी प्रशासनाने मान्य केल्याने ही बस आता बांदा येथून पावणेचारला सुटणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची पायपीट थांबणार आहे. बसच्या वेळेत बदल केल्याने आगार व्यवस्थापक शेवाळे व स्थानक प्रमुख नीलेश वारंग यांचे उपसरपंच मराठे यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com