दाभोलीत आजपासून महारुद्र अनुष्ठान

दाभोलीत आजपासून महारुद्र अनुष्ठान

दाभोलीत आजपासून महारुद्र अनुष्ठान
वेंगुर्ले ः कुडाळदेशकर ज्ञातीच्या दाभोली येथील श्री मठ संस्थानमध्ये १८ व १९ फेब्रुवारीला महारुद्र अनुष्ठानचे आयोजन केले आहे. उद्या (ता. १८) सकाळी ७.३० वाजता मंगलाचरण, देवता प्रार्थना, महारुद्र जप व इतर धार्मिक विधी, दुपारी १.३० वाजता आरती, नामजप, सायंकाळी ७ वाजता धुपारती, रात्री ८ वाजता भजन, रविवारी (ता. १९) सकाळी ७.३० वाजता धार्मिक विधी, महारुद्र जप, पूर्णानंद स्वामी महापूजा, संकल्पोक्त हवन, देवता पूजन, बलिदान पूर्णाहुती, महानैवेद्य, ९ वाजता वरद शंकर पूजा, दुपारी आरती, २ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ७ वाजता धुपारती असे कार्यक्रम होणार आहेत.
--
सरमळेत आज महाशिवरात्रोत्सव
ओटवणे ः सरमळे येथील श्री देव सपतनाथ मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त उद्या (ता. १८) रात्री ८.३० वाजता पारंपरिक डबलबारी भजनाच्या जंगी सामन्याचे आयोजन केले आहे. डबलबारीचा हा सामना सरमळे येथील ओंकार भजन मंडळाचे भजनी बुवा समीर गावडे (पखवाज-किरणकुमार चव्हाण, तबला-अर्जुन पालयेकर) आणि राजापूर-आजीवली येथील विठ्ठल रखुमाई भजन मंडळाचे भजनी बुवा प्रवीण सुतार (पखवाज-बंटी मुळम, तबला-रितेश पांचाळ) यांच्यात रंगणार आहे. कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीदेवी सातेरी भगवती कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाने केले आहे.
--
दोडामार्गला उद्या शिवजयंती सोहळा
दोडामार्ग ः येथील बाजारपेठेतील सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक उदय पास्ते यांच्या निवासस्थानाजवळ प्रांगणात रविवारी (ता. १९) शिवजयंती सोहळा साजरा करण्यात येणार आहे. सकाळी ९ वाजता छत्रपती शिवरायांच्या मूर्तीचे पूजन, १० वाजता अल्पोपहार, १०.३० वाजता लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, ११.३० वाजता बाजारपेठेतून भव्य रॅली काढण्यात येणार आहे. या सोहळ्याला सर्व शिवप्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन शिवजयंती उत्सव, दोडामार्गने केले आहे.
--
विहिरीत पडलेल्या बैलास जीवदान
सावंतवाडी ः येथील २० फूट खोल गांधी निराधार योजनेच्या विहिरीत पडलेल्या बैलाला जीवदान दिल्याची घटना रेडी येथे काल (ता. १६) सकाळी घडली. रेडी येथील अशोक दाभोलकर यांच्या मालकीचा बैल रेडी विठोबा मंदिर नजीक असलेल्या २० फूट खोल विहिरीतील पाण्यात पडला. ही घटना ग्रामस्थांना समजताच माजी सरपंच अनंत कांबळी, नेपोलिन जेराल, सदानंद रेडकर, अजित पडवळ, मनीष कृष्णाजी, जयेश राणे, अशोक दाभोलकर आदी ग्रामस्थांनी बैलाला विहिरीतून दोरखंडाच्या सहाय्याने बाहेर काढून जीवदान दिले.
--
मालवणमध्ये आज पादुका पूजन सोहळा
मालवण ः अक्कलकोट येथील स्वामी समर्थ महाराजांच्या मूळस्थानाहून स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकांचे आगमन अॅड. उल्हास कुळकर्णी यांच्या निवासस्थानी उद्या (ता. १८) सकाळी ११ ते ५ या वेळेत होणार आहे. यावेळी ब्रह्मवृंदांच्या वेदमंत्राने पादुकांचे पूजन होणार आहे. भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन उल्हास कुळकर्णी आणि परिवाराने केले आहे.
--
सातार्डा येथे आज विविध कार्यक्रम
सावंतवाडी ः महाशिवरात्रीनिमित्त सातार्डा येथील श्री महादेव मंदिरात उद्या (ता. १८) सकाळी विविध कार्यक्रम व अभिषेक होणार आहे. सायंकाळी सात वाजता कीर्तन होणार आहे. भाविकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन श्री देव रवळनाथ पंचायतन देवस्थान उपसमितीच्यावतीने करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com