रत्नागिरी- महाशिवरात्र

रत्नागिरी- महाशिवरात्र

rat१७४१.txt

बातमी क्र.. ४१ (पान ३ साठी)

भैरी- तृणबिंदुकेश्वर मंदिरात आज महाशिवरात्र उत्सव

रत्नागिरी ः श्री भैरी श्रीदेव भैरी जोगेश्वरी नवलाई पावणाई ट्रस्टतर्फे शनिवारी (ता. १८) महाशिवरात्र उत्सवाचे आयोजन केले आहे. यामध्ये सकाळी ७.३० वा. श्रीदेव तृणबिंदुकेश्वरावर लघुरूद्र, ८ वा. श्रीदेव भैरीवर अभिषेक, भजन व कीर्तन होईल. त्यानंतर १० वा. श्री सोमेश्वर प्रासादिक भजन मंडळ, (किरडुवे देवरूख, बुवा अमोल पांचाळ), १२ वा. श्री हनुमान प्रासादिक भजन मंडळ (तरवळ बुवा संजय मा चिवले), दुपारी २ वा. श्री माऊली प्रासादिक भजन मंडळ (सैतवडे बुवा सुनील मिरजुळकर) भजन सादर करतील. सायं. ४ वा. देवरूखचे कीर्तनकार हभप दत्तराज वाडदेकर कीर्तन करतील. सायं. ५ वा. श्री सिद्धीविनायक भजन मंडळ (खालची आळी, शुभदा आगाशे व सहकारी), सायं. ६ वा. श्री जय हनुमान प्रासादिक भजन मंडळ (कोतवडे, बुवा विजय मयेकर), ८ वा. जय भैरव प्रासादिक भजन मंडळ (मुरुगवाडा बुवा अजय पिलणकर) आणि रात्री १० वा. श्री दत्त प्रासादिक भजन मंडळ (घुडेवठार, बुवा सुदेश नागवेकर) भजन सादर करतील. रात्री १२ वा. भोवत्या होऊन उत्सवाची सांगता होईल.
--

फोटो ओळी
-rat१७p३८.jpg-
८३५१३
सिन्नर ः येथे अॅड. दीपक पटवर्धन यांचा सत्कार करताना राज्याचे सहकारमंत्री अतुल सावे. सोबत खासदार गोडसे.
----------
सहकारमंत्र्यांच्या हस्ते ॲड. पटवर्धन यांचा सत्कार

रत्नागिरी ः राज्य पतसंस्थेचा फेडरशेनचे नूतन कार्याध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांचा सत्कार सिन्नर येथे सहकारमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते करण्यात आला. नाशिक पतसंस्था फेडरेशनतर्फे नाट्यगृहात या कार्यक्रमाचे आयोजन केले. या वेळी खासदार गोडसे उपस्थित होते. नाशिक जिल्ह्यातील अनेक पतसंस्था प्रतिनिधींसमोर केंद्रीय अर्थसंकल्पातील सहकार क्षेत्रासाठीच्या तरतुदी यावर ॲड. दीपक पटवर्धन यांचे व्याख्यान झाले. सहकारी संस्थांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये कोणत्या तरतुदी करण्यात आल्या आहेत याचे सविस्तर विवेचन मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या पतसंस्थांच्या प्रतिनिधींसमोर पटवर्धन यांनी केले.
----

श्रीदेव भैरी देवस्थानची उद्या शिमगोत्सव बैठक

रत्नागिरी ः रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री देव भैरी देवस्थानच्या शिमगोत्सव नियोजनासाठी रविवारी (ता. १९) सकाळी १० वा. मंदिरात बैठक आयोजित केली आहे. ६ मार्चपासून भैरीबुवाचा शिमगोत्सव सुरू होणार आहे. देवस्थानचा शिमगा उत्सवाचा कार्यक्रम ठरवण्यासाठी वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे. याकरिता १२ वाड्यांतील सर्व मानकरी, गावकरी, ट्रस्टी, गुरव मंडळी व ग्रामस्थांनी श्रीदेव भैरी मंदिरात उपस्थित राहावे, अशी विनंती देवस्थानचे अध्यक्ष रवींद्र तथा मुन्ना सुर्वे यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com