पान एक-

पान एक-

पान एक

टीपः swt१७२२.jpg मध्ये फोटो आहे.

८३५५६
कणकवली : येथील पटवर्धन चौकातील सभेत बोलताना खासदार संजय राऊत. बाजूला आमदार वैभव नाईक, संदेश पारकर, सुशांत नाईक आदी (छायाचित्र : अनिकेत उचले)


शिवसेना संपवण्याचे शिंदे, राणे सूत्रधार
खासदार संजय राऊत; कणकवलीतील सभेत राणेंवर जोरदार हल्लाबोल
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. १७ : शिवसेना पक्ष संपविण्याचे कारस्थान मोदी आणि अमित शहा यांनी रचले, तर मुख्यमंत्री शिंदे आणि राणे हे सूत्रधार त्‍याची अंमलबजावणी करत आहेत; पण शिवसेना संपवायला निघालेल्‍या सिंधुदुर्गातील नेत्याची आज अवस्था काय, असा प्रश्‍न शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आज उपस्थित केला. सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेल्‍या खासदार राऊत यांचे आज कणकवलीत जोरदार स्वागत केले. शहरातील पटवर्धन चौकात त्‍यांची सभा झाली. खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, जिल्‍हाप्रमुख संजय पडते, युवासेना जिल्‍हाप्रमुख सुशांत नाईक, शिवसेना नेते संदेश पारकर, सतीश सावंत, अतुल रावराणे
आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
राऊत म्‍हणाले, ‘‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पन्नास वर्षांपूर्वी शिवसेनेचे रोपटे वाढवले. शिवसेनेत आलेल्‍या काहींना माणसे केली. त्‍यांना सरदारही बनवले; पण काही सरदारांनी उद्धव ठाकरे यांच्या पाठीवर वार केले. शिवसेना संपविण्याचा विडा उचलला. त्‍यांना आम्‍ही सोडणार नाही. आज मुंबईत आणि महाराष्‍ट्रात जी शिवसेना उभी आहे, त्‍यामागे कोकणातील माणसाचे मोठे योगदान आहे. कोकणातील चाकरमान्यांनी रक्‍ताचे पाणी करून शिवसेना वाढवली; पण मोदी आणि अमित शहा यांनी शिवसेना संपविण्याचे कारस्थान रचले. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नारायण राणे त्‍याचे सूत्रधार बनून अंमलबजावणी करत आहेत; परंतु कोणी कितीही वेळा शिवसेना संपविण्याचा प्रयत्‍न केला तरी शिवसेना संपणार नाही. न्यायालयाचा निर्णय काहीही लागला तरी आमची लढाई सुरूच राहणार आहे.’’
ते म्‍हणाले, ‘‘गेले सहा महिने शिवसेना कुणाची हा खटला सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. यावर आम्‍ही पूर्वीच भूमिका स्पष्‍ट केली आहे. जर तुम्‍हाला शिवसेना कुणाची हा निर्णय घेता येत नसेल, तर तो निर्णय महाराष्‍ट्रावर सोपवा. इथली जनताच शिवसेना कुणाची, यावर निर्णय घेईल. शिवसेनेच्या स्‍थापनेनंतर २८० सेना स्थापन झाल्‍या; पण भारतीय सेना आणि शिवसेना या दोनच शिल्‍लक राहिल्या आणि यापुढेही राहतील. केंद्र आणि राज्‍यातील भाजप आघाडीचे सरकार सुडाचे राजकारण करत आहे. मला तुरुंगात टाकले, तर शिवसेनेत राहिलेल्‍या आमदारांवर खोटे खटले दाखल केले जात आहेत. आमदारांची चौकशी केली जात आहे; पण जे सरकार भ्रष्‍टाचारातून उभे राहिले, ते आमच्या आमदारांची काय चौकशी करणार?’’


... तर कनेडी पॅटर्न वापरू
सिंधुदुर्गातील दहशतवाद आम्‍ही यापूर्वीच गाडून टाकला आहे. तरीही शिवसैनिकांवर हल्‍ले केलात, तर आम्‍ही गप्प बसणार नाही. कनेडीत जसा दणका दिला, तोच ‘कनेडी पॅटर्न’ पुन्हा दाखविल्‍याशिवाय राहणार नाही, असा इशारा खासदार राऊत यांनी दिला.

तीन महिन्यांत
जेवणाचे ३ कोटी
राज्‍यात, कोकणात बेरोजगारी वाढत आहे, तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रालयातील जेवणावळीवर तीन महिन्यांत तब्‍बल ३ कोटी खर्च झाल्‍याचे माहिती अधिकारातून उघड झाले असल्‍याचे राऊत म्‍हणाले. उद्धव ठाकरे अडीच वर्षे, तर वसंतराव नाईक ११ वर्षे मुख्यमंत्री होते; पण जेवणावळीवर तीन कोटींचा खर्च करणारे शिंदे हे पहिलेच मुख्यमंत्री आहेत, असा टोलाही राऊत यांनी हाणला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com