
शिवरायांची मूर्ती देऊन सावंतवाडीत शिवजयंती
83603
सावंतवाडी ः येथे एका छोट्या मावळ्याला छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती देऊन गौरव करण्यात आला.
शिवरायांची मूर्ती देऊन
सावंतवाडीत शिवजयंती
सावंतवाडी ः खासदार उदयनराजे भोसले यांच्या कल्पनेतून प्रत्येक घराघरांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती देऊन शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. सावंतवाडी राजे प्रतिष्ठान कामगार सेना, सिंधुदुर्ग यांच्यामार्फत प्रत्येकाच्या घराघरांमध्ये जाऊन मूर्ती देण्यात आली. यावेळी राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष तळवणेकर, उपाध्यक्ष संदीप नाईक, सचिव ज्ञानेश्वर पारधी, सदस्य सचिन गावडे, राष्ट्रीय छावा संघटना प्रवक्त शिवा गावडे, खजिनदार मंगेश माणगावकर, माडखोल अध्यक्ष संदीप चांदेलकर, सल्लागार श्याम सावंत आदी उपस्थित होते.
------------
कबीर हेरेकरचा सावंतवाडीत गौरव
सावंतवाडी ः येथील राष्ट्रीय छावा संघटना व राजे प्रतिष्ठानतर्फे येथील प्राणिमित्र, निसर्ग प्रेमी व पर्यावरण रक्षक म्हणून ओळखला जाणारा कबीर हेरेकर या चिमुकल्याचा छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती देऊन गौरव करण्यात आला.