संगीत राज्य नाट्यस्पर्धेची सांगता

संगीत राज्य नाट्यस्पर्धेची सांगता

rat१८१०. txt

( पान २ साठी मेन)

फोटो ओळी
- rat१८p१६.jpg-
८३६६२
रत्नागिरी : संगीत नाट्य स्पर्धेला रत्नागिरीकरांचा असा उत्तम प्रतिसाद मिळत होता.
(छायाचित्र : दिलीप केळकर)
-
संगीत नाट्य स्पर्धेतून सव्वा लाखांचा महसूल

२३ संगीत नाटके सादर ; रत्नागिरीकरांचा भरभरून प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १८ : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे ६१ व्या संगीत मराठी नाट्यस्पर्धेची अंतिम फेरी येथील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात पार पडली. राज्यभरातील सहभागी नाट्यसंस्थांनी रसिकांचा आनंद द्विगुणित केला. संगीत आणि अभिनयासह नेपथ्य, प्रकाशयोजना, पार्श्वसंगीत अशा तांत्रिक बाजूंचे वेगळेपण पाहावयास मिळाले. या स्पर्धेतून शासनाला १ लाख १८ हजार ७६० रुपयांचा महसूल प्राप्त झाल्याची माहिती येथील केंद्राचे समन्वयक नंदकिशोर जुवेकर यांनी दिली.
मुंबई, पुणे, सांगली, गोवा, अहमदनगर, रत्नागिरी येथील २३ नाटकांनी सहभाग नोंदवला. संगीतप्रेमी रत्नागिरीकरांनी यावर्षी ५९ हजार ८० रुपयांची सीझन तिकिटांची खरेदी केली, तर करंट बुकिंगद्वारे ६३ हजार ६८० रुपये असा एकूण एकूण १ लाख १८ हजार ७६० रुपयांचा महसूल रत्नागिरी केंद्रातून शासनाला मिळाला. यावर्षी संगीत ऋणानुबंध, आपुलाची वाद आपणासी, संगीत मल्लिका, संगीत त्रिवेणी, संगीत माऊली, नात्यांचे गणित, संगीत सूरसाधक, संगीत अवघी विठाई माझी, संगीत डबल लाईफ अशा नव्या कोऱ्या संहितांचेही सादरीकरण झाले. दिग्दर्शक, संगीत दिग्दर्शक यांना आपले कौशल्य पणाला लावले होते. काहींच्या नाटकांमध्ये नावीन्य होती. मात्र काही नाटकांच्या नाट्यपदांचा पोत रसिकांना भावला नाही. केवळ संहितेत मध्ये हवे म्हणून नाट्यपदांचे सादरीकरण झाल्यासारखे वाटले. मात्र २३ नाटकांमध्ये त्रिवेणी, मल्लिका, तमसो मा ज्योतिर्गमय, मंदारमाला, कट्यार काळजात घुसली, माऊली, सूरसाधक, अयोध्येचा ध्वजदंड या नाटकांची संगीताची बाजू भक्कम होती. नाट्यपदांना मिळणारी साथसंगतही कौशल्यपूर्ण होती. अनेक वादकांनी वेगळेपण जपण्याचा प्रयत्न केला. काही नाटकांमध्ये नेपथ्य, रंगभूषा, दिग्दर्शन यांच्या त्रुटी जाणवल्या. यावर्षी बालकलाकारांच्या उत्तम अभिनयाने रंगत भरली.
--
भरजरी नाट्यसंपदा लोप पावतेय...

रत्नागिरीत हौशी संगीत राज्य नाट्यस्पर्धा आमच्यासाठी पर्वणी होती. प्रत्येक संघ मोठ्या उत्साहाने उतरला होता. गेला महिनाभर हा उत्सव पार पडला. मात्र एकंदर स्पर्धेतील सादरकरणातून गंधर्वयुगातील भरजरी नाट्यसंपदा कुठेतरी हरवत चालल्याचे दिसले. रंगभूमी प्रायोगिकतेकडे अधिक झुकत चालली आहे. आधुनिक तंत्राचा वापर वाढू लागला आहे. त्यामुळे पारंपरिकता, ती दरवळ, पडदे, नाट्यपदांची पारंपरिक सुरावट कमी झाली आहे. अनेक नाटकांना तर संगीत नाटक का म्हणायचे हा प्रश्न पडला. संगीत नाट्य स्पर्धेत सादर करायचे म्हणून त्यात गाणी असा प्रकार होता. पुढच्या पिढीला भरजरी नाटकं फक्त व्हिडिओद्वारेच पाहावी लागतील की काय, अशी भीती ज्येष्ठ तबलावादक हेरंब जोगळेकर यांनी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com