रत्नागिरी ः ऐन शिमग्याच्या सणात कोकणात राजकीय शिमगा

रत्नागिरी ः ऐन शिमग्याच्या सणात कोकणात राजकीय शिमगा

शिमग्यात कोकणचे राजकारण ढवळणार
पाच मार्चला उद्धव ठाकरे खेडमध्ये ; संजय कदमांचा पक्षप्रवेश
रत्नागिरी, ता. १८ः ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पाच मार्चला खेड येथे येणार असून, राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. या वेळी त्यांच्यासोबत अनेक पदाधिकारीही पक्षप्रवेश करणार असल्याचे समजते.
शिवसेना पक्षाचे नाव व चिन्ह गेल्यावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच रत्नागिरी कोकणात येत असून या वेळी त्यांची एक जाहीर सभा होणार आहे. या सभेत ते काय बोलतात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे जाहीर सभा घेणार आहेत.
शिवसेना नेते व शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी माजी आमदार संजय कदम यांच्या पक्षप्रवेशाला दुजोरा दिला होता. त्याप्रमाणे त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन याबाबत खेडमध्ये जाहीर सभेसाठी मागणी केली होती.उद्धव ठाकरे सभा घेणार, असे जाधव यांनी सांगितले होते. माजी आमदार संजय कदम यांच्या पक्षप्रवेशासाठी उद्धव ठाकरे हे रत्नागिरीच्या दौऱ्यावर पाच मार्चला येणार आहेत. आमदार योगेश कदम यांच्याविरोधात आता संजय कदम हे उभे राहणार आहेत. मूळचे शिवसैनिक असलेले संजय कदम काही अंतर्गत वादामुळे राष्ट्रवादीत गेले होते. ते राष्ट्रवादीच्या तिकिटावर आमदार झाले. परंतु आता विद्यमान आमदार योगेश कदम हे शिंदेगटात म्हणजे शिवसेना पक्षात गेले असल्यामुळे ही जागा मूळ शिवसेनेची असल्याने संजय कदम हे दापोली, मंडणगड, खेड विधानसभेचे आमदारपदाचे उमेदवार म्हणून जाहीर होणार अन त्यासाठी ते शिवसेनेत प्रवेश करणार असे सांगितले जात होते. कदम यानी मात्र उद्धव यांची भेट अद्याप घेतलेली नाही असे सांगितले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com