मालवणात शिवनामाचा गजर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मालवणात शिवनामाचा गजर
मालवणात शिवनामाचा गजर

मालवणात शिवनामाचा गजर

sakal_logo
By

swt२०१४.jpg
८४०६६
मालवणः शिवजयंती सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपच्यावतीने शहरातून भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली.

मालवणात शिवनामाचा गजर
भाजपकडून मानवंदनाः दुचाकी रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २०ः ‘जय भवानी जय शिवाजी’चा जयघोष, शहरातून काढण्यात आलेली भव्य दुचाकी रॅली आणि ढोल-ताश्यांच्या गजरात किल्ले सिंधुदुर्गवर भाजपच्यावतीने काल (ता. १९) शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. माजी खासदार नीलेश राणे यांच्या हस्ते शिवराजेश्वर मंदिरात पूजा करण्यात आली. आगामी विधानसभा निवडणुकीत नीलेश राणे आमदार होऊ दे, असे साकडे यावेळी घालण्यात आले.
दरवर्षीप्रमाणे यंदाही भाजप नेते माजी खासदार राणे यांच्यावतीने किल्ले सिंधुदुर्ग येथे शिवजयंती सोहळा साजरा करण्यात आला. यानिमित्त कुंभारमाठ येथील शिवपुतळ्याकडून शहरातील बाजारपेठेत भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली. भगवे झेंडे घेऊन काढलेल्या रॅलीमुळे शहर भगवामय झाले होते. त्यानंतर शिवराजेश्वर मंदिरात राणेंच्या हस्ते महाराजांचे पूजन करण्यात आले. यावेळी नीलेश राणे महाराजांसमोर नतमस्तक झाले. यावेळी भाजप पदाधिकारी व शिवप्रेमींच्या घोषणांनी, ढोलताशा पथकाच्या गजराने व फटाक्यांच्या आतषबाजीने परिसर दुमदुमून गेला.
भाजप जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन राजन गावकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, बाबा मोंडकर, विजय केनवडेकर, अशोक तोडणकर, गणेश कुशे, मंदार लुडबे, ललित चव्हाण, सौरभ ताम्हणकर, अजिंक्य पाताडे, राजू परुळेकर, आनंद शिरवलकर, आप्पा लुडबे, प्रकाश मेस्त्री, भाई मांजरेकर, अभय कदम, राजू बिड्ये, पूजा करलकर, पूजा सरकारे, ममता वराडकर, अन्वेशा आचरेकर, निषय पालेकर, राकेश सावंत, गौरव लुडबे यांसह भाजप पदाधिकारी व शिवप्रेमी उपस्थित होते.
आगामी विधानसभा निवडणुकीत कुडाळ-मालवण मतदारसंघातून नीलेश राणे निवडणूक लढवणार असून ते भरघोस मतांनी विजयी होऊ दे, असे गाऱ्हाणे भाजप पदाधिकारी व पूजारी यांच्यावतीने महाराजांच्या चरणी घालण्यात आले. यावेळी राणे यांनी, शिवजयंतीचा सण आमच्या दैवताचा आहे. शिवरायांची जयंती महाराष्ट्रातच नाही तर अख्ख्या जगात साजरी होते. ३९३ वर्षे जयंतीला पूर्ण झाली. अजून तीन हजार वर्षे तरी होतील. हे छत्रपती शिवाजी महाराजांचे तेज असून ते कोणी मिटवू शकत नाही, असे सांगितले.

चौकट
किल्ला परिसरात चोख बंदोबस्त
किल्ले सिंधुदुर्ग येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना तसेच भाजपाच्यावतीने शिवजयंती उत्सवानिमित्त दोन्ही पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने दाखल होते. या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस निरीक्षक विजय यादव यांच्या नेतृत्वाखाली किल्ले परिसरात चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.